शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हैस दूध दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ, वारणा दूध संघाच्या सभेत विनय कोरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 14:42 IST

वारणानगर : वारणा दूध संघाने अहवाल सालात सुमारे १३८९ कोटीं रुपयांची वार्षिक उलाढाल केली आहे. फरक बिल वाटप पद्धतीत ...

वारणानगर : वारणा दूध संघाने अहवाल सालात सुमारे १३८९ कोटीं रुपयांची वार्षिक उलाढाल केली आहे. फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याबाबत निर्णय वारणा दूध संघाकडून घेण्यात येणार असून त्यानुसार म्हैस दूध उत्पादकास फरक बिल नको असल्यास सध्याच्या दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास सध्याच्या दरात १ रुपयांनी वाढ देण्यात येऊन अडीच रुपये प्रमाणे फरक बिल देण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वार्षिक सभेत केली.येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघाचे कार्यस्थळावर पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत करून दुग्ध व्यवसायासमोर अनेक आव्हाने असताना या परिस्थितीला सामोरे जाऊन संघाने यशस्वी वाटचाल केल्याचे सांगितले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.डॉ. कोरे म्हणाले, संघाच्या दूध संकलन वाढीच्या दृष्टीने अनेक योजना राबविल्या. कोरोना महामारीचे संकट आणि जनावरांमध्ये शिरलेल्या लम्पीसारख्या आजारामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. अशा काळात वारणेने दूध उत्पादकांना दूध दर, विविध सवलती, फरक बिलासारखे लाभ दिलेत. सहकारी तत्वावरील संस्था मोडीत काढण्याचा बाहेरील कंपन्या जादा दराचे आमिष दाखवून कुटील डाव काही लोक करीत आहेत. यावर पर्याय म्हणून फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याचा निर्णय वारणेने घेतला आहे. वारणा आणि गावातील सहकारी संस्थांमध्ये करार करण्यात येऊन सभासदाने पुरवठा केलेल्या दुधाची नोंद संघाच्या कार्यालयात होईल, त्यामुळे संस्थांच्या कमिशनमध्येही वाढ करण्यात येणार आहे.यावेळी नॅशनल को ऑफ डेरी फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्रीनिवास सज्जा, व्यवस्थापक अविनाश घुले, संजीव आग्रवाल, भारतीय रेल्वेचे वारणाचे राष्ट्रीय वितरक अमित कामत, आंध्रप्रदेशातील दुग्ध व्यवसायातील उद्योजक हर्षा गांधी यांच्यासह दूध संघातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था, दूध उत्पादक व गोठेधारकांचा आमदार कोरे यांच्याहस्ते विशेष सत्कार आला. कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.सभेस संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, लेखापरीक्षक रणजीत शिंदे, संघाचे सर्व संचालक मंडळ, वारणा समूहातील पदाधिकारी, अधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले.

सभेत 'लोकमत' वृत्तसमूहाचे अभिनंदनलोकमत वृत्तसमूहाने बिझनेस अॅन्ड इंडस्ट्री विभागात वारणा दूध संघाचा व माझा केलेला सन्मान हा वारणेचे सर्व दूध उत्पादक सभासद व सर्व घटकांचा असल्याचा उल्लेख डॉ. कोरे यांनी करून लोकमतने केलेल्या वारणेच्या गौरवाबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी सर्व सभासदांनी जोराने टाळ्यां वाजवून लोकमत समूहाचे अभिनंदन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध