शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:03 IST

कोल्हापूर : यंदा पावसाने शेतकºयांची दमछाक केली असली तरी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्याच्या भूगर्भातील पाणी

ठळक मुद्देसप्टेंबर-आॅक्टोबरमधील पावसाचा परिणाम हातकणंगले, शिरोळची पातळी घसरली

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : यंदा पावसाने शेतकºयांची दमछाक केली असली तरी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्याच्या भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा दीड फुटांनी पाणी पातळी वर सरकल्याने यंदा पाणीटंचाईच्या झळा फारशा सहन कराव्या लागणार नाही. हातकणंगले व शिरोळची सरासरी गतवर्षीपेक्षा सुधारली असली तरी पाच वर्षांच्या तुलनेत कमीच राहिली आहे.

कोल्हापूर जिल्हा ‘पाणीदार’ जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्याला कारणेही तशीच असून जिल्ह्यात सरासरी १७७२ मिलीमीटर पाऊस होतो. जोरदार पाऊस व धरणांमुळे येथे मुबलक पाणी उपलब्ध आहे; पण गेल्या तीन-चार वर्षांपासून कोल्हापूरकरांनाही दुष्काळाची झळ बसू लागली आहे. गेल्यावर्षी तर वार्षिक सरासरीच्या केवळ ४८ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला होता.

पाण्याच्या पातळीत सव्वा दोन फुटांनी घसरण झाल्याने फेबु्रवारीनंतर पाणीटंचाई जाणवू लागली. यंदा जून, जुलैमध्ये मोठा नसेना पण एकसारखा जिरवणीचा पाऊस झाला. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला, पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अखंड आॅक्टोबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाच महिन्यांत जिल्ह्णात सरासरी १३८९.३४ मिलीमीटर (७८ टक्के) पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली.गेल्यावर्षी जानेवारीमधील पाणीपातळीच्या तुलनेत गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यातील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पातळी गेल्यावर्षीपेक्षा वाढली असली तरी मागील पाच वर्षांच्या तुलनेत थोडी घसरली आहे.जांभ्यामुळे पातळी खालीगगनबावडा, शाहूवाडी, चंदगड व भुदरगड तालुक्यांत चांगला पाऊस होतो; पण या तालुक्यातील पातळी४-५ फुटांपर्यंत खाली असते. येथे जांभ्या दगडाचा थर असल्याने पावसाचे पडलेले पाणी जमिनीत न झिरपता ते मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळेच पाणी पातळीत सुधारणा होत नाही.तालुकानिहाय सरासरी व यंदा झालेला पाऊस (मिलीमीटर)तालुका सरासरी पाऊस यंदाचा पाऊसहातकणंगले ८२०.४० ६२८.८७शिरोळ ३८५.३० ६४२.४१पन्हाळा १४१६.२० १३३२.६२शाहूवाडी १५४२.३० १८४३.५०राधानगरी ३५०१.६० १७८५.६०गगनबावडा ५६२९.४० ३२५२.००करवीर ७९६.९० ८१९.७७कागल ६४९.६० १०६८.६९गडहिंग्लज ७८४.६० ७२९.४०भुदरगड १३४३.७० १३६१.४०आजरा १७८९.७० १५३४.५०चंदगड २६०९.०० १६७३.२७जानेवारीमधील सर्वेक्षणानुसार तालुकानिहाय भूजल पातळी (मीटर )तालुका जानेवारी २०१६ आॅक्टोबर २०१७करवीर ३.८४ १.२४कागल २.३४ १.३६पन्हाळा ३.७८ १.७२शाहूवाड ५.९० २.७४हातकणंगले ४.६४ २.३८शिरोळ ४.७० २.६८राधानगरी २.८६ १.२१गगनबावडा ६.०० ३.४५भुदरगड ४.२६ २.५४गडहिंग्लज ३.३५ १.९१आजरा ३.८९ १.८५चंदगड ७.८४ ४.३७

टॅग्स :riverनदीWaterपाणी