एफएसआय वाढवून द्या, कमी व्याजाने कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST2021-07-28T04:25:35+5:302021-07-28T04:25:35+5:30

कोल्हापूर : दरवर्षी पुराच्या पाण्याचा हा त्रास ठरलेला आहे. आता आम्हाला इमारती बांधायला एफएसआय ...

Increase FSI, lend at low interest | एफएसआय वाढवून द्या, कमी व्याजाने कर्ज द्या

एफएसआय वाढवून द्या, कमी व्याजाने कर्ज द्या

कोल्हापूर : दरवर्षी पुराच्या पाण्याचा हा त्रास ठरलेला आहे. आता आम्हाला इमारती बांधायला एफएसआय वाढवून द्या आणि बांधकामासाठी कमी व्याजाने कर्ज द्या, अशी मागणी येथील कुंभार गल्लीतील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजून ४० मिनिटांनी पवार शाहुपुरी कुंभार गल्ली येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी नगरसेविका पूजा नाईकनवरे, उदय कुंभार, अमर समर्थ यांनी पवार यांना पूरस्थितीची माहिती दिली.

उदय कुंभार म्हणाले, दरवर्षी पाऊस जास्त पडला की, गल्लीत पाणी येते. आता खाली रिकामी जागा सोडून वर बांधकाम करण्याची आमची तयारी आहे. तेव्हा महापालिकेकडून एफएसआय वाढवून द्यावा आणि बांधकामासाठी कमी व्याजाने कर्जपुरवठा करण्यात यावा. जवळूनच जयंती नाला वाहत असल्याने या पुराची तीव्रता मोठी असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह महापालिकेचे प्रमुख अधिकारी, दिलीप शेटे, आर. के. पोवार, राजू लाटकर, आदिल फरास यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते.

चौकट

पॉझिटिव्हिटी रेट ५ च्या आत आणा, वेळ वाढवून देतो

यावेळी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यापाऱ्यांना दुकानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. आधीचा महापूर, नंतर कोरोना आणि आता कोरोना आणि महापूर यात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे सांगितले. यावेळी पवार म्हणाले, ‘तुम्ही पॉझिटिव्हिटी रेट’ पाचच्या आत आणा तुम्हाला दुकानांसाठी वेळ वाढवून देतो.

२७०७२०२१ कोल कुंभार गल्ली ०१

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथील कुंभार गल्लीतील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.

छाया आदित्य वेल्हाळ

Web Title: Increase FSI, lend at low interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.