सवलतीच्या साखर दरामध्ये दरवाढ अयाेग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:51+5:302021-05-17T04:21:51+5:30
निवेदनात सन २०१७-१८ मधील तीन लाख ऐंशी हजार टन उसाचे दोनशे रुपयेप्रमाणे बिल देणे आहे. त्यावर संचालक मंडळ बोलत ...

सवलतीच्या साखर दरामध्ये दरवाढ अयाेग्य
निवेदनात सन २०१७-१८ मधील तीन लाख ऐंशी हजार टन उसाचे दोनशे रुपयेप्रमाणे बिल देणे आहे. त्यावर संचालक मंडळ बोलत नाही. अशातच चालू गळीत हंगामातील घोषित केलेल्या दराप्रमाणे बिले देणे बाकी आहेत. ती तातडीने द्यावीत, म्हणजे सेवा संस्थेची थकीत बाकी देणे शक्य होईल. आधीच सभासदांच्या सवलतीची साखर संचालक मंडळ वेळेवर देत नसताना, दुसरीकडे वाढविलेला दर आणि ज्यांच्या नावावर एक वर्ष ऊस नाही, अशा सभासदांना दुपटीने दरवाढ, ही मनमानी ठरत आहे. याशिवाय कारखान्यांच्या अनेक मालमत्ता खासगी भाडेतत्त्वाने अनेकांना दिल्या आहेत. हे कोणत्या प्रकारात बसते व कशा करारावर दिले, याची लेखी माहिती त्वरित द्यावी. अन्यथा जूनपासून ठिया आंदोलन सुरू करणार आहोत.
निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, साताप्पा पाटील, विलास पाटील, रंगराव पाटील, रावसाहेब डोंगळे, नामदेव कारंडे यांच्या सह्या आहेत.