कोरोना रुग्णात वाढ, १९९९ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:18+5:302021-07-14T04:29:18+5:30
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात चोवीस तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नव्याने १९९९ जणांना कोरोनाची लागण झाली ...

कोरोना रुग्णात वाढ, १९९९ नवे रुग्ण
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात चोवीस तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नव्याने १९९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू कोल्हापूर शहरातील आहेत. १७९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५६ टक्के आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत दोन दिवसांपूर्वी काही प्रमाणात घट झाली होती. त्यात पुन्हा वाढ झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकूण मृतांची संख्या पाच हजारपेक्षा अधिक झाली आहे. सलग दोन महिने मृतांचा आकडा दोन अंकीच आहे. चोवीस तासांत जिल्ह्यातील २४ तर, परजिल्ह्यातील एक अशा २५ जणांचा मृत्यू झाला आहे. भुदरगड, शिरोळ, चंदगड, गगनबावडा तालुक्यात एकही मृत्यू नाहीत. पण चोवीस तासांत झालेल्या एकूण मृत्यूपैकी चौघेजण दीर्घकाळ आजारी होते. एकूण मृतांपैकी १६ जण ६० वर्षांवरील होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्या ४८ तासांत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होत आहे. मात्र मृत्यूची संख्या आणि रुग्णांची संख्या कमी करणे आरोग्य प्रशासनास आव्हानात्मक बनले आहे.
चौकट
कोरोनाने मृत झालेल्यांच्या परिसराचे आणि गावचे नाव तालुकानिहाय असे : कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत, जवाहरनगर, कदमवाडी, राजारामपुरी दोन, साने गुरुजी वसाहत, ताराबाई पार्क, मंगळवार पेठ.
करवीर : खुपीरे, शिये, प्रयाग चिखली, कणेरीवाडी, बहिरेश्वर, पीरवाडी.
पन्हाळा : कोडोली, मोहिरे.
हातकणंगले : वडगाव, रेंदाळ, माणगाव.
गडहिंग्लज : अत्याळ, चन्नेकुप्पी.
कागल : बोळावी
आजरा : आजरा
शाहूवाडी : वारेवाडी