शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

लाचप्रकरणी आयकर निरीक्षकास सोमवारपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:00 IST

Bribe Case Kolhapurnews- एका डॉक्टरकडून कारवाई टाळण्यासाठी १० लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. १८) रंगेहात पकडलेल्या आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्देअन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी सीबीआयकडेही तपास जाण्याची शक्यता

कोल्हापूर : एका डॉक्टरकडून कारवाई टाळण्यासाठी १० लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. १८) रंगेहात पकडलेल्या आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.करवीर तालुक्यातील एका होमिओपॅथी डॉक्टरने २०१२ पासून इन्कम टॅक्स भरलेला नाही. त्याने मोठ्या प्रमाणात माया जमविली आहे. याची चौकशी व्हावी म्हणून आयकर विभागाच्या टाकाळा येथील कार्यालयात निनावी अर्ज आला होता.

या अर्जाची चौकशी करण्याचे काम आयकर निरीक्षक चव्हाण याच्याकडे सोपविण्यात आले होते. संबंधित डॉक्टरला कारवाईची भीती दाखवून चव्हाण याने ३० लाखांची मागणी केली होती. तडजोड करून हा व्यवहार १४ लाखांवर आला.

तत्पूर्वी डॉक्टरने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहनिशा करून त्या अनुषंगाने लक्ष्मीपुरीतील विल्सन पुलाजवळ सापळा रचण्यात आला होता. शुक्रवारी (दि. १८) सकाळी तक्रारदाराच्या चारचाकीत १० लाख रुपयांची लाच चव्हाण याने स्वीकारली. दबा धरून बसलेल्या ह्यलाचलुचपतह्णच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

शनिवारी दुपारी चव्हाण याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, शनिवारी आयकर विभागातील चव्हाण याच्याशी संबंधित अन्य अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली, अशी माहिती विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.सीबीआयकडे तपास जाण्याची शक्यताआयकर निरीक्षक चव्हाण हे केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या आयकर विभागाच्या सेवेत आहेत. त्यामुळे लाचप्रकरणी झालेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज्य शासनाकडे सोपविणार आहेत. राज्य शासन सीबीआयकडे तपास सोपविण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या अखत्यारित असलेले लाचलुचपत खाते केंद्र शासनाच्या सेवेत असलेल्या नोकरदारांवर कारवाई करू शकत नाही, असा अनेकांचा गैरसमज होता. मात्र, या कारवाईमुळे लोकसेवक हा केंद्राचा असो अथवा राज्य शासनाचा; त्याला कायदा सारखाच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर