जिल्ह्यात चार ठिकाणी मोबाइल चोरीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:13+5:302021-01-16T04:27:13+5:30
कोल्हापूर : जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, कुरुंदवाड या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील विविध ठिकाणी मोबाइल चोरीच्या चार घटना घडल्या. ...

जिल्ह्यात चार ठिकाणी मोबाइल चोरीच्या घटना
कोल्हापूर : जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, कुरुंदवाड या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील विविध ठिकाणी मोबाइल चोरीच्या चार घटना घडल्या. या चोरींची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये झाली.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोबाइल चोरीची फिर्याद आकाश रंगराव अस्ले (वय २३, मूळगाव म्हासुर्ली, राधानगरी, सध्या रा. महाकाली मंदिराजवळ, शिवाजी पेठ) यांनी दिली. त्यांचा मोबाइल अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून नेला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोबाइलची चोरीची फिर्याद स्नेहल संतोष लोहार (वय १९, रा. कुंभार गल्ली, चोकाक ) यांनी दिली आहे. त्या लक्ष्मीपुरी येथील बसथांब्यावरून रुकडी-माणगाव के.एम.टी.बसमध्ये चढत असताना पाठीवर अडकविलेल्या सॅकमधून त्यांचा मोबाइल अज्ञाताने लंपास केला. तिसरी चोरीची घटना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. यामध्ये आरती सुधीर साखळकर (वय २७, रा. यादव काॅलनी, बँक ऑफ इंडियाजवळ, पेठवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दाभोळकर काॅर्नर सिंग्नल परिसरातील के.एम.टी. बस थांब्याजवळ त्या के.एम.टी. बसमध्ये चढत असताना त्यांच्या ड्रेसवरील ॲप्रनमध्ये ठेवलेला मोबाइल अज्ञाताने लंपास केला. चौथी घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. यात प्रवीण प्रकाश ऐनापुरे (वय ३९, रा. औरवाड, ता. शिरोळ) यांनी दिली. ते कुरुंदवाड आठवडा बाजारामध्ये दौलतशहा दर्ग्यासमोर भाजीपाला खरेदी करीत होते. अज्ञाताने त्यांच्या खिशातील मोबाइल लंपास केला.
चौकट
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी
गुन्हे आढावा बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताच्या तक्रारीची शहानिशा करून गुन्हे नोंद करावेत, अशी सक्त सूचना सर्व पोलीस निरीक्षकांना दिली होती. त्यामुळे मोबाइल चोरीसारख्या घटनांचीही नोंद आता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात होत आहे.