शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कारखाली सापडून बालिका ठार, लोहार वसाहत येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:28 IST

काकाची गाडी आली असे म्हणत आडवी आलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा कारच्या धडकेत गंभीर जखमी होवून दूर्देवी मृत्यू झाला. भक्ती दीपक वडनकर (रा. लोणार वसाहत, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घरासमोरच घडली.

ठळक मुद्देकारखाली सापडून बालिका ठारलोहार वसाहत येथील घटना

कोल्हापूर : काकाची गाडी आली असे म्हणत आडवी आलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा कारच्या धडकेत गंभीर जखमी होवून दूर्देवी मृत्यू झाला. भक्ती दीपक वडनकर (रा. लोणार वसाहत, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घरासमोरच घडली.दिपक वडनकर व त्यांचे भाऊ दिनेश वडनकर हे लोणार वसाहत येथे राहण्यास आहेत. त्यांचा ट्रक बॉडी करण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी दिनेश हे कार घेऊन कामाच्या ठिकाणी गेले होते. काही वेळाने ते परत आहे. यावेळी भक्ती आजीसोबत दारात बसली होती. काकांची गाडी आली असे म्हणत ती अचानक कारसमोर आली.

दिनेश यांना कार आवरता न आल्याने तिला धडक बसली. डोक्याला गंभीर दूखापत होवून ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. अचानक घडलेल्या अपघाताने वडनकर कुटूंबिय भांबावून गेले. त्यांनी त्याचा कारमधून शाहुपूरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

कोवळ्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहून आई-वडीलांनी केलेला अक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे लोणार वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, असा परिवार आहे. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर