आयजीएममधील घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:28+5:302021-05-12T04:25:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील आय़सीयूमध्ये लागलेली आग प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री ...

The incident in IGM was noticed by the Chief Minister | आयजीएममधील घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल

आयजीएममधील घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील आय़सीयूमध्ये लागलेली आग प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. त्याचबरोबर रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती घेत, त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या घटनेची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी रुग्णालय प्रशासन, तसेच विविध यंत्रणांकडून माहिती घेतली व याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना अवगत केले. आयजीएम रुग्णालयातील आयसीयूमधील यंत्रात आग लागल्याचे लक्षात येताच, या ठिकाणच्या वाॅर्ड बॉय, सुरक्षा रक्षक, तसेच डॉक्टर्स या सर्वांनी तात्काळ हालचाली केल्या. प्रसंगावधान राखून अग्निशमन उपकरणाचा वापर करून आग रोखण्यात आली. वीजपुरवठा बंद करून, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यात रुग्णांचीही पुरेपूर काळजी घेण्यात आल्याने पुढील अप्रिय घटना टाळण्यात यश आले.

घटनाक्रमाची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घटनास्थळावर धाडसाने, प्रसंगावधान राखून आग रोखण्यासाठी तात्काळ धावपळ करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र शेटे, तसेच वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक, डॉक्टर्स यांच्या समन्वयाचे कौतुक केले. त्यांनी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सुखरूप राहावेत यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली.

Web Title: The incident in IGM was noticed by the Chief Minister