लिंगनूर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण माग
By Admin | Updated: December 12, 2014 00:07 IST2014-12-11T23:59:45+5:302014-12-12T00:07:05+5:30
नळयोजनेची चौकशी; आठ दिवसांत अहवाले

लिंगनूर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण माग
गडहिंग्लज : लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील वादग्रस्त नळपाणी योजना कामाच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसांत मिळेल. त्यामध्ये मंजूर प्लॅन इस्टिमेटप्रमाणे काम न झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाईची शिफारस वरिष्ठांकडे केली जाईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी चंचल पाटील यांनी ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. त्यामुळे काल, बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण ग्रामस्थांनी आज, गुरुवारी सायंकाळी उशिरा मागे घेतले.
लिंगनूर माळावरील गोकुळ चिलिंग सेंटरजवळ बांधण्यात आलेल्या नळयोजनेच्या पाण्याच्या नवीन टाकीला गळती लागली असून, निकामी झालेल्या जुन्या जलवाहिनीलाच नवीन योजनेच्या पाईप्स जोडून नव्या टाकीत पाणी टाकण्यात आल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
तक्रारीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या समितीने गावाला भेट देऊन वादग्रस्त योजनेच्या कामाची आज पाहणी केली. चौकशी समितीत शाखा अभियंता जी. डी. कुंभार, एस. एस. हवालदार व कनिष्ठ अभियंता एस. व्ही. केदार यांचा समावेश होता.
दरम्यान, सायंकाळी गटविकास अधिकारी पाटील यांच्या दालनात चौकशी अधिकारी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, विश्वनाथ पाटील, श्रीकांत साळोखे यांनी ग्रामस्थांची बाजू मांडली (प्रतिनिधी)
वादग्रस्त नळयोजनेच्या कामासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार चौकशी समितीच्या अहवालात वस्तुनिष्ठ नोंदी आढळून न आल्यास शासनमान्य अॅथॉरिटीकडून कामाची फेरतपासणी करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी बैठकीत दिला. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.