शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, लेखापरीक्षकांमुळे प्रोत्साहन अनुदान रखडले; मंत्र्यानेच केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 13:24 IST

सहकार मंत्र्यांकडे करणार तक्रार

कोल्हापूर : जिल्ह्यातील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारने मंजूर केले. परंतू सहकार खात्याचे अधिकारी आणि लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे ते रखडले असल्याचा आरोप खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.या अनुदानाच्या रक्कमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवडाभरात जमा न झाल्यास सहकार मंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिवांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय जुना असल्याने यात आचारसंहितेची अडचण नसल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.पत्रकात मुश्रीफ म्हणतात, पीक कर्जाची नियमितपणे मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने दि. २९ जुलै २०२२ रोजी निर्णय घेतला. त्यानुसार सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात कर्जउचल करून नियमितपणे मुदतीत परतफेड केलेले शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरणार होते. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी या तीनपैकी एकाच वर्षात दोन हंगामांची पीककर्ज कर्ज उचल करून परतफेड केलेली आहे, ते या लाभापासून वंचित राहत होते. अशा शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या १४,४०० इतकी आहे.                        

कोल्हापूरला आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ५ मार्च २०२४ ला शुद्धिपत्रकासह नवीन शासन निर्णय जाहीर केला. या शुद्धिपत्रकाला अनुसरूनच १५ मार्च २०२४ रोजी सहकार खात्याने मार्गदर्शनपर सूचना जारी केल्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या सचिवांनी लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली. या याद्या निकषांनुसार बँकेच्या निरीक्षकांनी तपासल्या व पात्र रकमा निश्चित केल्या आहेत.

असा आहे गुंताविकास सेवा संस्थांच्या सचिवांनी आणि बँकेच्या निरीक्षकांनी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या. परंतु; सहकार विभागाच्या अधिकारी आणि लेखापरीक्षकांनी पात्र लाभार्थ्याच्या अंतिम याद्या तपासलेल्या नाहीत. परिणामी; हे अनुदान रखडले आहे. या याद्या तपासण्यासाठीच्या उदासीनतेमुळे पात्र शेतकऱ्यांचे ५४ कोटी रुपये अडकून पडले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरministerमंत्रीFarmerशेतकरी