‘इनकम्पलीट’ लघुपटाची बाजी

By Admin | Updated: April 8, 2015 00:33 IST2015-04-07T23:57:36+5:302015-04-08T00:33:12+5:30

औरंगाबाद येथे विजेता : विविध चित्रपट महोत्सवात नामांकन

'Inccomplete' shortcut beta | ‘इनकम्पलीट’ लघुपटाची बाजी

‘इनकम्पलीट’ लघुपटाची बाजी

कोल्हापूर : कोल्हापुरातील कलावंतांच्या समूहाने निर्मिती केलेल्या ‘इनकम्पलीट’ या लघुपटाने देशभरातील विविध चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे.  या लघुपटाची संकल्पना कोल्हापूरचे निर्माते आणि सृजनशील दिग्दर्शक उदय राजाराम पाटील यांची आहे. याशिवाय कोल्हापूरच्या अशोक बाबू कांबळे यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यांनीच पटकथा आणि संवाद लेखन केले आहे.  विद्यार्थ्याची आत्महत्या व कारणे या भोवती या लघुपटाचा विषय गुंफलेला आहे. पाल्याला सांभाळताना त्याच्या मनालाही सांभाळण्याचा संदेश या लघुपटातून पालकांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या लघुपटात कविता चव्हाण, जितेंद्र पोळ, आज्ञेश मुडशिंगीकर, रमेश डोंगरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जयदीप निगवेकर यांचे छायांकन असून ऋषिकेश जोशी यांचे संकलन आहे. कोल्हापुरातील राधाई स्टुडिओत याचे रिरेकॉर्डिंग झाले असून, संजय साळुंखे यांचे पार्श्वसंगीत आहे. प्रदीप राठोड, डॉ. प्रसाद पाटील, मोहन भरवसे, सहायक दिग्दर्शक संदीप मगदूम, बबलू कवठेकर, दादा मालेकर यांचा या लघुपट निर्मितीत सहभाग आहे.

Web Title: 'Inccomplete' shortcut beta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.