कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे उद्या उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST2020-12-26T04:18:58+5:302020-12-26T04:18:58+5:30

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वचनपूर्तीतून कसबा बावडा येथील स्वस्तिक चौक येथे साकारलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे ...

Inauguration of water tank at Kasba Bawda tomorrow | कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे उद्या उद्घाटन

कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे उद्या उद्घाटन

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वचनपूर्तीतून कसबा बावडा येथील स्वस्तिक चौक येथे साकारलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन व विविध विकास कामांचा प्रारंभ रविवार (दि.२७) रोजी पालकमंत्री ना. सतेज पाटील व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याच कार्यक्रमाअंतर्गत विधान परिषदेचे नूतन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा सत्कार भाजी मंडई येथे होणार आहे.

यावेळी खा. संजय मंडलिक, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या बावडा फायर स्टेशनजवळील नागरी सुविधा केंद्राचा प्रारंभ तसेच कसबा बावडा, कदमवाडी रस्ता व चॅनेल कामाचा प्रारंभही मान्यवरांच्याहस्ते होईल.

Web Title: Inauguration of water tank at Kasba Bawda tomorrow