कौशल्य विकास केंद्राचे आज उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:29+5:302021-03-09T04:26:29+5:30
न्यू कॉलेजमध्ये प्रश्नमंजूषा कोल्हापूर : विज्ञान दिनानिमित्त न्यू कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने प्रश्नमंजूषा घेण्यात आली. त्यामध्ये सी. डार्विन या बी. ...

कौशल्य विकास केंद्राचे आज उदघाटन
न्यू कॉलेजमध्ये प्रश्नमंजूषा
कोल्हापूर : विज्ञान दिनानिमित्त न्यू कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने प्रश्नमंजूषा घेण्यात आली. त्यामध्ये सी. डार्विन या बी. एस्सी. भाग एकच्या विद्यार्थी गटातील गौरव गिरीश, सेजल गायकवाड, तृप्ती कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पाश्चर या गटातील ऋतुजा ससे, शिवानी पाटील, श्रृती पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. या विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. ए. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले.
आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे अभ्यासक्रम
कोल्हापूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) स्ट्रीव्ह प्रोजेक्टअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत विविध व्यवसायातील अल्पमुदतीचे सीएनसी प्रोग्रॅमरर, डिझायनर मॅकेनिकल, आदी नऊ अभ्यासक्रम बुधवार (दि. १०) पासून सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
‘ग्रामीण पत्रकारिता’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश
कोल्हापूर : येथील गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग मान्यताप्राप्त ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रा. आर. के. हराळे, आर. बी. सुतार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. के. पाटील यांनी केले.