जयसिंगपुरात श्रीराम मंदिर गृहसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:10+5:302021-01-03T04:26:10+5:30
जयसिंगपूर : प्रभू श्री रामचंद्र आणि हिंदू समाजाचे शतकानुशतकाचे नाते आहे. या प्रवाहातच आम्हीदेखील वाढलो आहोत. त्यामुळे या उपक्रमात ...

जयसिंगपुरात श्रीराम मंदिर गृहसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
जयसिंगपूर : प्रभू श्री रामचंद्र आणि हिंदू समाजाचे शतकानुशतकाचे नाते आहे. या प्रवाहातच आम्हीदेखील वाढलो आहोत. त्यामुळे या उपक्रमात सहभागी राहू, असे प्रतिपादन उद्योगपती विनोद घोडावत यांनी केले. जयसिंगपूर येथे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, श्री राम मंदिर गृहसंपर्क व धनसंग्रह अभियानाच्या शिरोळ तालुका कार्यालयाचे उद्घाटन उद्योगपती घोडावत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमोद मिराशी यांनी रामजन्मभूमी अभियानाची माहिती दिली.
या कार्यक्रमाला संतोष पाटील, महेंद्र रजपूत, विजय उपाध्ये, विशाल पुजारी, मंदार कुलकर्णी, सदानंद तिवडे, बाहुबली पाटील, श्रेणिक चौगुले, गणेश कोळेकर, रमेश यळगुडकर, राजेंद्र दाईंगडे, मिलिंद भिडे, प्रमोद वाड, दीपक अणेगिरीकर, प्रवीण रक्ताडे, सर्वदमण कुलकर्णी, श्रीप्रसाद कुलकर्णी, सुनील ताडे, शैलेश गाडे, संजय चौगुले, किरण कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, निखील अणेगिरीकर उपस्थित होते.
फोटो - ०२०१२०२०-जेएवाय-०७
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे श्री राम मंदिर गृहसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्योगपती विनोद घोडावत यांच्या हस्ते झाले.