शोभाताई कोरे चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:21+5:302020-12-09T04:19:21+5:30
वारणानगर : बहिरेवाडी गावाने नेहमीच कोरे कुटुंबाला आधार दिला आहे. बहिरेवाडीला विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ...

शोभाताई कोरे चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन
वारणानगर : बहिरेवाडी गावाने नेहमीच कोरे कुटुंबाला आधार दिला आहे. बहिरेवाडीला विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार डाॅ. विनय कोरे यांनी दिली.
बहिरेवाडी येथील ग्रामपंचायतीच्यावतीने स्व. शोभाताई कोरे (आईसाहेब) चिल्ड्रन पार्क, वाॅटर एटीएम, ग्रामपंचायत पेव्हिंग ब्लाॅक, अंगणवाडी सुशोभीकरण अशा विविध कामांचे उद्घाटन, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थ्यांना मंजुरीपत्र, विद्यामंदिर बहिरेवाडीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार कोरे यांच्या हस्ते झाला.
प्रारंभी सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी स्वागत करून गावातील कामांची माहिती दिली.
यावेळी वारणा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक एच. आर. जाधव, लायन्स क्लबचे डाॅ. एस. आर. पाटील, मावजी पटेल, जयश्री पाटील, माजी समाजकल्याण भापती विशांत महापुरे,माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील, पन्हाळा पंचायत समितीच्या माजी सभापती गीतादेवी पाटील, रणजित शिंदे, जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, उपसरपंच तानाजी सरनाईक, ग्रामसेवक तुषार गिरीगोसावी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. महेश जाधव यांनी आभार मानले.
................................
फोटो...बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे आमदार डॉ. विनय कोरे यांचा सत्कार वारणा दूध संघाचे संचालक एच. आर. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच शिरीषकुमार जाधव, एस. आर. पाटील, मावजी पटेल, जयश्री पाटील, गीतादेवी पाटील, तानाजीराव सरनाईक आदी उपस्थित होते.
...........................................