केर्लेतील शाळेच्या सांस्कृतिक भवनचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:21+5:302021-03-31T04:24:21+5:30
शाळेसाठी लोकसहभागातून १२ लाख रुपये खर्चून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले. यासाठी दालमिया फाउंडेशन ५ लाख, प्रा. बाळाबाई शिंदे दोन ...

केर्लेतील शाळेच्या सांस्कृतिक भवनचे उद्घाटन
शाळेसाठी लोकसहभागातून १२ लाख रुपये खर्चून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले. यासाठी दालमिया फाउंडेशन ५ लाख, प्रा. बाळाबाई शिंदे दोन लाख आणि माजी विद्यार्थी शशिकांत पोवार यांच्यासह उर्वरित रक्कम लोकसहभागातून गोळा करण्यात आली, तसेच शाळेला सुसज्ज अशी ‘अटल ट्रक्लिंग लॅब’ मिळाल्याने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक जगाची ओळख होणार असल्याचे विश्वजित खाडे यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण मिळविलेल्या अनुराधा पोवार या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युनिट हेड एन.सी. पालीवाल, प्रा. बाळाबाई शिंदे, विश्वजित खाडे, नितीन कुरळुपे, शशिकांत पोवार, एस.जी. रणदिवे, दत्तात्रय गोळे यांनी मनोगत व्यक्त केली. विक्रम सिंग, मनिकंदन, सुरेश चेचर, संस्थेचे ज्येष्ठ संचालक नामदेव पाटील, बाळासाहेब माने, अर्जुन शिर्के उपस्थित होते.