बानगेत आज ऑनलाईन शाळा ॲपचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:08+5:302021-08-21T04:29:08+5:30

यावेळी जि. प.च्या महिला व बालकल्याण सभापती शिवानी विजयसिंह भोसले, उपसभापती मनीषा संग्राम सावंत, जि. प. सदस्य युवराज पाटील, ...

Inauguration of online school app in Banga today | बानगेत आज ऑनलाईन शाळा ॲपचे उद्घाटन

बानगेत आज ऑनलाईन शाळा ॲपचे उद्घाटन

यावेळी जि. प.च्या महिला व बालकल्याण सभापती शिवानी विजयसिंह भोसले, उपसभापती मनीषा संग्राम सावंत, जि. प. सदस्य युवराज पाटील, माजी शिक्षण सभापती अंबरीश घाटगे आदी प्रमुख मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. दीप फौंडेशनचे प्रमुख तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड (अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली या पथदर्शी ऑनलाईन शिक्षणाचा ढाचा बनविण्यात आला आहे.

दरम्यान, ना. मुश्रीफ यांनी या संकल्पनेकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. प्रथमतः कागल तालुक्यातील शाळांना हे ॲपद्वारे शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ६० शिक्षकांंना प्रशिक्षण देण्यात आले आहे, तर आठवडाभरानंतर वाड्या-वस्त्यांसह जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यानंतर राज्यभरात हे ॲप पोहोचविण्याचा मानसही ना. मुश्रीफ यांनी केला असल्याचेही डॉ. कमळकर यांनी सांगितले.

Web Title: Inauguration of online school app in Banga today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.