इचलकरंजीत वारणा दूध संघाच्या नवीन शॉपीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:16+5:302021-07-14T04:28:16+5:30
वारणानगर : येथील वारणा दूध संघाच्यावतीने इचलकरंजीतील गांधी पुतळा चौक येथील शेतकरी संघाच्या जागेत ‘वारणा मिल्क शॉपी’ या नवीन ...

इचलकरंजीत वारणा दूध संघाच्या नवीन शॉपीचे उद्घाटन
वारणानगर : येथील वारणा दूध संघाच्यावतीने इचलकरंजीतील गांधी पुतळा चौक येथील शेतकरी संघाच्या जागेत ‘वारणा मिल्क शॉपी’ या नवीन विक्री केंद्राचे उद्घाटन वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, संचालक प्रदीप देशमुख, महेंद्र शिंदे, शेतकरी संघाचे संचालक राजू पाटील - टाकवडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी कार्यकारी संचालक मोहन येडूरकर म्हणाले, शेतकरी संघाने कोल्हापूर येथील कपिलतीर्थ मार्केट, भवानी मंडप, लक्ष्मीपुरी येथे वारणा उत्पादनांच्या नवीन शॉपी सुरू केल्या असून, त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता इचलकरंजी येथे नव्याने सुरू केलेल्या वारणा शॉपीत दुग्ध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहेत, त्याचा लाभ येथील ग्राहकांना मिळणार आहे.
उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी शेतकरी संघ व वारणेचे पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. वारणाच्या उत्पादनांनी भारतीय बाजारपेठेत नावलौकिक प्राप्त केला असून, इचलकरंजी शहर व परिसरात वारणाची उत्पादने आणखीन नावारूपाला येतील, असे सांगितले.
प्रारंभी शेतकरी संघाचे संचालक राजू पाटील (टाकवडेकर) यांनी स्वागत केले. यावेळी संघाचे अकौंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर, मार्केटिंग विभागाचे अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, सिव्हील विभागाचे शरद शेटे, इचलकरंजी शाखाप्रमुख जनगोंड पाटील, अन्य मान्यवर व ग्राहक उपस्थित होते.
इचलकरंजी येथील शेतकरी सहकारी संघाच्या जागेत वारणा मिल्क शॉपी या नूतन विक्री केंद्राचे उद्घाटन वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, संचालक प्रदीप देशमुख, महेंद्र शिंदे, शेतकरी संघाचे राजू पाटील-टाकवडेकर, दूध संघाचे सुधीर कामेरीकर, अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, आदी उपस्थित होते.