तेरवाड येथे मुक्तेश्वर ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:22+5:302021-06-17T04:17:22+5:30
कुरुंदवाड : प्राणवायू ही एक निसर्गातून मिळणारी फुकट देणगी आहे आणि हीच देणगी आपल्या पुढच्या पिढीला मोफत उपलब्ध व्हावी ...

तेरवाड येथे मुक्तेश्वर ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन
कुरुंदवाड : प्राणवायू ही एक निसर्गातून मिळणारी फुकट देणगी आहे आणि हीच देणगी आपल्या पुढच्या पिढीला मोफत उपलब्ध व्हावी व कोरोनासारख्या आजारापासून आपल्या सर्वांचे रक्षण व्हावे याकरिता तेरवाड (ता. शिरोळ) येथील संत कवी मुक्तेश्वर यांच्या ३७५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पंचगंगा नदी काठावर ‘मुक्तेश्वर ऑक्सिजन’ पार्क उभारण्यात येत आहे.
कै. गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था (बार्टी) पुणे यांच्या पुढाकाराने ऑक्सिजन पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात येत असून, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच लक्ष्मीबाई तराळ, शोभा आवळे, म्हादगौडा पाटील, महावितरण अधिकारी मयूर आवळे, शशिकांत घाटगे, आमगौडा पाटील, परशुराम तराळ, अरुण भंडारे, संजय डाफले, मुरग्याप्पा हेगडे, सुखदेव हेगडे, बंडू पाटील उपस्थित होते.
उमेश आवळे यांनी स्वागत केले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था पुणेच्या सुनंदा मेटकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अमोल खोत यांनी आभार मानले.
फोटो - १६०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - तेरवाड (ता. शिरोळ) येथे मुक्तेश्वर ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रामचंद्र डांगे, सुनंदा मेटकर, लक्ष्मीबाई तराळ, अमोल खोत, उमेश आवळे उपस्थित होते.