शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन ;उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:18 IST

collector Kolhapur Drakshe- उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021चे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते आज झाले.

ठळक मुद्देकोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन ;उत्पादक ते ग्राहक थेट विक्री30 मार्चपर्यंत शाहू स्मारकमध्ये निर्यातक्षम, चांगल्या प्रतीची द्राक्ष

कोल्हापूर : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021चे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते आज झाले.दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे 30 मार्चपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 या कालावधीत हा महोत्सव चालणार आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी फित कापून या महोत्सवाचे आज उद्घाटन केले.

यावेळी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी महोत्सवातील शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली.जंबो सिडलेस खास आकर्षणमहोत्सवामध्ये ग्राहकांना अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के.सुपर, शरद सिडलेस आदी जातींची द्राक्षं आहेत. मिरज तालुक्यातील सोनी येथील दिलीप पाटील, प्रतिक लेंगरे या शेतकऱ्यांची जंबो सिडलेस ही द्राक्षं या महोत्सवाची खास आकर्षण ठरली.     कोव्हिड-19 मुळे शेतकरी वर्गात शेतमाल उत्पादन विक्रीबाबत चिंतेचे वातावरण होते.  विशेषत: द्राक्ष बागायतदारांची निर्यात ठप्प्‍ा होती. त्यामुळे  शेतकरी उत्पादकांच्या मालाची थेट ग्राहकांनी विक्री करण्याच्या उद्देशाने अशा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले, असे सांगून पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक घुले म्हणाले, गोवा येथेही द्राक्ष महोत्सव भरवण्यात आला होता.

ग्राहकांना  तसेच शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ मिळाला. कोल्हापूर येथील महोत्सवातही ग्राहकांनी भेट देवून सहभाग घ्यावा. निर्यातक्षम, चांगल्या प्रतीची द्राक्ष ग्राहकांना थेट उत्पादकांकडून मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक लाभ होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरfruitsफळे