आपटेनगर कोल्हापूर येथे ‘गोकुळ’ शॉपीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:17+5:302021-08-20T04:28:17+5:30
कोल्हापूर: गोकुळच्या आपटेनगर परिसरातील नव्या शॉपीचे व मे. रामचंद्र तवनाप्पा मूग यांच्या ८व्या शाखेचा उद्घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे ...

आपटेनगर कोल्हापूर येथे ‘गोकुळ’ शॉपीचे उद्घाटन
कोल्हापूर: गोकुळच्या आपटेनगर परिसरातील नव्या शॉपीचे व मे. रामचंद्र तवनाप्पा मूग यांच्या ८व्या शाखेचा उद्घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे , महावीर रामचंद्र मूग व गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या उपस्थितीत झाला.
गोकुळची विविध दर्जेदार उत्पादने उपलब्ध व्हावीत आणि उत्पादनाचा परिसरातील नागरिकांना आस्वाद घेता यावा याकरिता नवीन शॉपी सुरू केली आहे. येथे दुधाबरोबरच श्रीखंड, आम्रखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी हे दुग्ध पदार्थ मिळणार आहेत.
यावेळी दीपाली राहुल मूग, गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, प्रतीक मुळीक, शॉपीचे मालक स्वेता पाटील, जयवंत पाटील उपस्थित होते.
फोटो : १९०८२०२१-कोल-गोकुळ
फोटो ओळ : आपटेनगर येथील गोकुळ शॅापीचे उद्घाटन अध्यक्ष विश्वास पाटील यांंच्या हस्ते व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, मे. मूग बझारचे महावीर रामचंद्र मूग, दीपाली राहुल मूग, गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, मार्केटिंग विभागाचे हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.