गडहिंग्लज नगरपालिकेच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST2021-05-15T04:22:09+5:302021-05-15T04:22:09+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड काळजी केंद्राचे उद्घाटन गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव ...

Inauguration of Coving Center of Gadhinglaj Municipality | गडहिंग्लज नगरपालिकेच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

गडहिंग्लज नगरपालिकेच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड काळजी केंद्राचे उद्घाटन गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते झाले.

शहरातील गांधीनगरमधील पॅव्हेलियन हॉलमध्ये हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये पुरूषांसाठी ३६ व महिलांसाठी १३ बेडसची स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे.

यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, नरेंद्र भद्रापूर, उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेवक प्रकाश मोरे, उदय कदम, शकुंतला हातरोटे, सुनीता पाटील, क्रांती शिवणे, वीणा कापसे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगर अभियंता सुधीर पोतदार, सागर पाटील आदी उपस्थित होते.

------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज नगरपालिकेच्या कोविड सेंटरचे उद्घाटन अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी फित कापून केले. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नरेंद्र भद्रापूर व नगरसेवक उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : १४०५२०२१-गड-०६

Web Title: Inauguration of Coving Center of Gadhinglaj Municipality