शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

महेश जाधव उत्तरचे भावी आमदार, चंद्रकांत पाटील यांचे भाकीत, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 12:04 IST

सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपला पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेले महेश जाधव हे ‘उत्तर’चे भावी आमदार असतील, असे भाकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन  मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देमहेश जाधव उत्तरचे भावी आमदार, चंद्रकांत पाटील यांचे भाकीतसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपला पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेले महेश जाधव हे ‘उत्तर’चे भावी आमदार असतील, असे भाकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन  मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, आमदार सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पाटील म्हणाले, जाधव यांनी पक्ष, तालीम, देवस्थान समिती या माध्यमातून जे काम केले आहे. त्याचेच फळ म्हणून सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.प्र. द. गणपुले, सुभाष वोरा, बाबा देसाई यांनी पक्ष अतिशय कठीण परिस्थितीमध्ये टिकवला; परंतु तो कार्यालयातून रस्त्यावर आणण्याचे काम जाधव यांनी केले. विधानसभेला त्यांचा शानदार विजय व्हावा, अशी नियतीची इच्छा असावी म्हणूनच गतवेळी थोडक्यात त्यांचा पराभव झाला; मात्र भाजपचा त्यांच्यावर विश्वास आहे; त्यामुळेच २0१९ च्या विधानसभेला ते नक्की आमदार होतील.जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी सकाळपासून विविध थरातील मान्यवर आणि नागरिकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दूरध्वनीवरून जाधव यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जनसुराज्यचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश साळोखे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर महेश जाधव, आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, सुजित चव्हाण, भाजपचे जिल्हाप्रमुख संदीप देसाई, परशुराम तावरे, भगवान काटे, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जाधव यांना शुभेच्छा दिल्या. 

 

टॅग्स :Mahesh Jadhavमहेश जाधवkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील