ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन करा; अन्यथा सामुदायिक उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:00+5:302021-02-05T07:00:00+5:30
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे तयार केलेल्या वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज ...

ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन करा; अन्यथा सामुदायिक उद्घाटन
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे तयार केलेल्या वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते व आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली १० फेब्रुवारीपर्यंत करावे; अन्यथा ११ फेब्रुवारीला आमदार आवाडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून सामुदायिक उद्घाटन करण्यात येईल, असा इशारा केएटीपीचे अध्यक्ष विलास गाताडे व ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांना कोल्हापूरला हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच त्यांचा वेळ व पैसे वाचावेत, यासाठी वाहनधारकांच्या मागणीनुसार परिवहन खात्याच्या परवानगीने केएटीपी येथे वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधून देण्यात आला आहे. परंतु त्याचे उद्घाटन करून तो रितसर परिवहन खात्याच्या ताब्यात देण्याचे काम आजतागायत प्रलंबित आहे. त्यामुळे सुविधा निर्माण असतानाही वाहनधारकांची कुचंबणा होत आहे. याचा गांभीर्याने विचार करून तत्काळ उद्घाटन करावे; अन्यथा सामुदायिक उद्घाटन करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.