शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: गडहिंग्लज साखर कारखान्यात मुश्रीफांच्या आघाडीची विजयी घोडदौड, संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यास लागणार वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:53 IST

संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत.

राम मगदूमगडहिंग्लज: हरळी ( ता.गडहिंग्लज ) येथीलआप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार व माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील श्री. छत्रपती शाहू समविचारी आघाडीची विजयी घोडदौड सुरू असून राष्ट्रवादीचे  आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी श्री काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.आज, मंगळवारी(दि.८) सकाळी ८ वाजता येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. पहिला संस्था गटातील निकालाने मुश्रीफ यांच्या आघाडीच्या विजयाची नांदी झाली. 'शाहू आघाडी'चे उमेदवार सोमनाथ अप्पी पाटील यांनी २३७ पैकी १९९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी 'काळभैरव आघाडी'चे शिवाजी खोत यांना केवळ ३७ मतांवर समाधान मानावे लागले.राष्ट्रवादीचे माजी मंत्री मुश्रीफ, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, भाजपचे नेते डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार पाटील, जनता दलाचे माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, काँग्रेसचे संग्रामसिंह नलवडे यांच्या आघाडीमध्येच दुरंगी लढत झाली. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत.दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या ऊस उत्पादक कौलगे कडगाव गटातील मतमोजणीत मुश्रीफ आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. शहापूरकर यांच्यासह तीनही उमेदवार १८०० ते २१०० मतांनी आघाडीवर आहेत. यावरुन मुश्रीफ यांच्या आघाडीलाच स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक