शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

गाजलेल्या निवडणुका: श्रीपतराव शिंदे अवघ्या ६७४ मतांनी जिंकले !, बंडखोरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे लागले होते लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:09 IST

प्रचारासाठी आले होते तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग 

राम मगदूमगडहिंग्लज :१९९० ची गडहिंग्लज विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. त्या वेळी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब कुपेकर यांचा अवघ्या ६७४ मतांनी पराभव करून ॲड. श्रीपतराव शिंदे दुसऱ्यांदा आमदार झाले होते. दोघांच्याही स्वकियांच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.अॅड. शिंदे यांच्या विरोधात त्यांचेच ज्येष्ठ सहकारी, देवदासी चळवळीचे प्रणेते प्रा. विठ्ठल बन्ने यांनी अपक्ष तर कुपेकर यांच्याविरोधात त्यांचे कनिष्ठ बंधू भय्यासाहेब कुपेकर यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती.तथापि, काँग्रेसचे नेते राजकुमार हत्तरकी यांनी कुपेकरांऐवजी शिंदेंना साथ दिल्यामुळे शिंदे यांचा निसटता विजय झाला. सख्खे बंधू भय्यासाहेब यांच्या बंडखोरीचा फटका कुपेकरांना बसला.तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग तथा विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या प्रचारसभेचा फायदा शिंदेंना झाला. काँग्रेसअंतर्गत तालुक्यातील गटबाजी व कौटुंबिक वादामुळेच कुपेकरांची संधी थोडक्यात हुकली.

उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी :- श्रीपतराव शिंदे (जनता दल) : ४५९०१- बाबासाहेब कुपकेर (काँग्रेस आय) : ४५२२७- भय्यासाहेब कुपेकर (शिवसेना) : ८८८३- प्रा. विठ्ठल बन्ने (अपक्ष) : २०८५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४