शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नृसिंहवाडीत गुरुद्वादशी मोठ्या उत्साहात, दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:36 IST

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुद्वादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, ...

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुद्वादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजराथ आदी अनेक राज्यातून हजारो भाविकांनी श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजेरी लावली.श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी येथील शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी, व सरस्वती या नद्या मिळून तयार झालेली पंचगंगा तसेच कृष्णा व वेण्णा अशा सात नद्यांच्या पवित्र संगमावर औदुंबर वृक्षातळी तब्बल बारा वर्ष महाराजांनी येथे तपसाधना केली व कृष्णानदीच्या काठावर असलेली आठ तीर्थे भक्तोधारासाठी प्रकाशात आणली. महाराजांनी येथून गाणगापूर येथे जाण्यापूर्वी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ‘मनोहर’ पादुकांची व अन्नपूर्णा – जान्हवी देवतांची स्थापना केली. मनोहर पादुकांच्या रूपाने आपण सदैव येथे वास करू असा भक्तांना आशीर्वाद दिला. या मनोहर पादुकांच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच ‘गुरुद्वादशी’ होय. श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या अवतार समाप्तीचा दिवस देखील गुरुद्वादशी असलेने येथील उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या दिवशी अनेक राज्यातून गुरुशिष्य परंपरेतील भक्तांनी एकत्र येवून येथील पवित्र नदीमध्ये स्नान केले अनेकांनी पंचामृत अभिषेक, ध्यान धारणा, जप –जाप्य आदी अनुष्ठाने केली.   दत्त दर्शनासाठी २४ तास मंदिर खुले राहणार      गुरुद्वादशी उत्सवा निमित्य आज श्री दत्त मंदिरात पहाटे ४.३० वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा,सकाळी आठ ते बारा यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी बारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा, धूप, दीप, आरती, इंदुकोटी, नैवेद्य व महाप्रसाद होवून सायंकाळी ७ वाजता पवमान पंचसुक्त पठण. रात्री दहा वाजता कीर्तन व दीड नंतर धूप, दीप, आरती व पालखी सोहळा संपन्न होऊन दिवसरात्र मंदिर दत्त दर्शनासाठी खुले राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDatta Mandirदत्त मंदिर