शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Child marriage: बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवकांसह सदस्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:49 IST

कायद्याने २१ वर्षांखालील मुलगा व १८ वर्षांखालील मुलीचा विवाह करणे गुन्हा

कोल्हापूर : कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यातील गावांमध्ये बालविवाह झाल्याचे आढळल्यास गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून काढून टाकले जाईल, तर ग्रामसेवकांचे निलंबन केले जाईल. तसेच शहरात बालविवाह आढळल्यास वॉर्ड स्तरीय समिती अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा बालसंरक्षण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांच्यासह संबंधित समिती सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, बालसरंक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून बालविवाह प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करण्यात कसूर झाल्यास सदस्यांना जबाबदार धरून पदावरुन काढून टाकण्याची किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तालुका बालसंरक्षण समित्या सक्षम होण्यासाठी तहसीलदारांनी बालविवाह व संबंधित विषयांवर दरमहा नियमित आढावा घ्यावा, या कामात हलगर्जीपणा झाल्यास समिती सदस्यांना जबाबदार धरून कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिल्पा पाटील म्हणाल्या, कायद्याने २१ वर्षांखालील मुलगा व १८ वर्षांखालील मुलीचा विवाह करणे गुन्हा आहे. बालहक्क संरक्षण करणे ही ग्राम बालसंरक्षण समितीची जबाबदारी आहे. ग्रामसेवकांना ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांनी गावात बालविवाह कायद्याची जागृती करणे, बालविवाह होण्याआधीच रोखणे व बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न