शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांनी गनिमीकाव्याने उचंगी धरणाची घळभरणी पाडली बंद, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 16:01 IST

घळभरणीसाठी धरणस्थळावर आणलेल्या सर्व मशीनरी धरणग्रस्तांनी पिटाळून लावल्या. 

सदाशिव मोरे

आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी धरणाच्या घळभरणीचे काम धरणग्रस्तांनी गनिमीकाव्याने येऊन बंद पाडले. पुनर्वसन न झाल्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झाले होते. घळभरणीसाठी धरणस्थळावर आणलेल्या सर्व मशीनरी धरणग्रस्तांनी पिटाळून लावल्या. 

त्यानंतर धरणग्रस्तांची बैठक झाली. बैठकीत पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत जो पर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत धरणाचे काम बंदच राहील. आधी पुनर्वसन मगच धरण हा कायदा असतानाही तो पायदळी तुडवून धरणाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. पोलिसी खाक्या दाखवून धरणाची घळभरणी सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असा इशाराही यावेळी दिला.उचंगीचे धरणग्रस्त चाफवडेतून मोर्चाने धरणस्थळावर आले. मोर्चात धरणग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो, आधी पुनर्वसन मगच धरण, पोलिसी खाक्या दाखवून काम करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो यासह विविध घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने आक्रमक झालेल्या दिसत होत्या. 

धरण स्थळावर पाटबंधारे विभाग जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता विनया बदामी, उपविभागीय अभियंता विजय राठोड यांनी धरणग्रस्तांशी चर्चा केली. मात्र धरणग्रस्त पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीवर शेवटपर्यंत ठाम राहिले. धरणग्रस्त आजच्या मोर्चात काठ्या घेऊनच सहभागी झाले होते. त्यामुळे मशिनरीच्या चालकांनी आपली मशीन तातडीने धरण स्थळावरून हलविले. यावेळी धरणग्रस्तांनी काही चालकांना काठीचा प्रसादही दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर