चैत्रालीच्या अदाकारीला उत्स्फूर्त दाद
By Admin | Updated: March 9, 2015 23:45 IST2015-03-09T23:31:37+5:302015-03-09T23:45:33+5:30
इस्लामपुरात कार्यक्रम : बहारदार लावण्यांना सखींकडून वन्समोअर, टाळ्या अन् शिट्ट्या...

चैत्रालीच्या अदाकारीला उत्स्फूर्त दाद
इस्लामपूर : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ सखी मंचतर्फे सखी सदस्यांसाठी आयोजित ‘चैत्रालीचा नाद करायचा नाय’ या लावणी कार्यक्रमात सखींनी धमाल केली. टाळ्या, शिट्ट्या वाजविताना भिरभिरणारे रुमाल, ओढण्या आणि वन्समोअर देत लावण्यवतींच्या अदाकारीला सखींनी दाद दिली. ‘लोकमत’ सखी मंचतर्फे येथील राजारामबापू नाट्यगृहात या कार्यक्रमासाठी सखींनी तुडुंब गर्दी केली होती. सुरुवातीस ‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रध्देय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, बसी बाई हँडलूमच्या ज्योत्स्ना कटारिया, वर्धमान ज्वेलर्सच्या कविता ओसवाल व जिओ फ्रेश शॉपीच्या विद्या गोडबोले, राजकुमार मगदूम यांच्याहस्ते करण्यात आले. सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या लावणी कार्यक्रमाचे दोन वेगवेगळ्या वेळांमध्ये सादरीकरण करण्यात आले. गण, मुजरा अन् गवळण झाल्यानंतर चैत्रालीच्या टीममधील नृत्याप्सरांनी आपल्या दिलखेचक व मादक अदाकारीला सुरुवात केल्यावर उपस्थित सखी सदस्यांच्या तोंडातून आपसूकच ‘बाईचा नाद खुळा’ हे शब्द पुटपुटले जाऊ लागले. ‘ही पोरगी साजूक तुपातली..., शिट्टी वाजली..., भिंगरी ग भिंगरी..., जरा खाजवा की बुगडी शोधायला डोकं..., पाडाला पिकलाय आंबा... नाद खुळा... कैरी मी पाडाची...’ यांसह अनेक लावण्यांना सखींनी मनमुरादपणे दाद दिली. नृत्यांगनांची अदाकारी पाहताना सखींचे मन अन् पायही गाण्यावर थिरकत होते. काही सखींनी नेहमीप्रमाणेच नृत्याविष्कार सादर करुन आनंद लुटला. रागिणी, तनुजा, जयश्री, पद्मा, चंदन, सुनीता, रेखा, भाग्यश्री, मालती, शिल्पा, शीला, सीमा, सविता, उषा, गीतांजली, संगीता, नीलकमल, वैशाली, अवंतिका, मीनल, माया, रेखा, शोभा, शांता, सुजाता, जया, अलका या नृत्यांगनांनी सखींना आपल्या दिलखचक अदाकारीने बेहोश केले. या सर्वांवर कडी केली ती चैत्रालीने. सखींना नृत्यासाठी आव्हान देणारी त्यांची छबी मोबाईल कॅमेऱ्यातही टिपली जात होती. अखंड अडीच तासाच्या या रंगारंग कार्यक़्रमात सखींनी जल्लोष करुन महिला दिनाचा आनंद द्विगुणित केला. सखी मंच संयोजिकांनी आयोजन केले. कार्यक्रमाचे निवेदक राजकुमार मगदूम व लावणी कार्यक्रमाचे निवेदक अभिषेक, अर्चना वाळवेकर व स्वप्निल पुदाले यांचा चैत्राली राजे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर) कमिटी सदस्यांचा गौरव..! या कार्यक्रमावेळी सखी मंच नोंदणीसाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या शारदा जौंजाळ, डॉ. सुवर्णा माळी, सुजाता कारंजकर, विमल बोंगाणे, कौसल्या सूर्यवंशी, बीना शहा, मनीषा सपकाळ, माया बजबळकर, गीता पाटील, जया काशीद, पूजा माने, रेखा कुंभोजे, इंदुताई परीट, सुनीता सपकाळ, नंदा हुलके, सायली लोणिष्टे, कविता ओझा, दीपाली नावाडकर, सुनीता कदम, योगीता शहा, सविता कापसे, सुनंदा सोनटक्के, संगीता साळुंखे, वैशाली पाटील, सीमा शिराळकर, अरुंधती पाटील, डॉ. स्वाती कुंडले, सविता चोरगे, वंदना शहा, कल्पना पाटील, सुरेखा पाटील या कमिटी सदस्यांचा वारणा व्हॅली खरेदी—विक्री संघाच्या अध्यक्षा सौ. जयश्री पाटील व सत्यजित देशमुख यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. भाग्यवान विजेत्या..! कार्यक्रमावेळी उपस्थित सखींमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये भाग्यश्री पाटील, सुरेखा इटकरकर, वंदना कोळी, रेणुका यादव या वर्धमान ज्वेलर्सच्या सोन्याच्या नथीच्या विजेत्या ठरल्या. प्रमिला पाटील व स्वाती पाटील या बसी बाई हँडलूमच्या विजेत्या ठरल्या, तर नीशा जाधव या जिओ फे्रशच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. ही सर्व बक्षिसे पुढील कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. जिओ फ्रेशच्या विजेत्यांनी त्या कार्यालयाशी संपर्क साधावयाचा आहे.