सुधारित- सराफ संघातर्फे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:54+5:302021-07-08T04:16:54+5:30
कोल्हापूर : लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांर्तगत बुधवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व बंगाली सुवर्ण कारागीर संघाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात ...

सुधारित- सराफ संघातर्फे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोल्हापूर : लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांर्तगत बुधवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व बंगाली सुवर्ण कारागीर संघाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. सराफ संघाच्या महाद्वार रोड येथील कार्यालयात हे शिबिर पार पडले. या अंतर्गत १७ पिशव्या रक्ताचे संकलन झाले.
लोकमतची रक्तदान मोहीम सुरु झाल्यावर संघाने शिबिर घेण्यासाठी संघाने स्वत:हून संपर्क साधला व शिबिराचे नियोजन केले. या शिबिरात सराफ संघासह बंगाली सुवर्ण कारागीर संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार, संचालक संजय जैन, तेजस धडाम, प्रसाद कालेकर, सुहास जाधव, शिवाजी पाटील, सभासद राजू बारस्कर, अमर पाटील, बंगाली सुवर्ण कारागीर संघाचे अध्यक्ष बिश्वजीत प्रामाणिक, उपाध्यक्ष इंद्रजित सामंत, देबाशिव दिनेरिया, राजकुमार गुराणी, संदीप मंडल, श्यामसुंदर पाल उपस्थित होते.
--
फोटो नं ०७०७२०२१-कोल-सराफ संघ
ओळ : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने बुधवारी महाद्वार रोड येथील कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
--