सुधारित : शिवसैनिकांची कोणीही घुसमट करू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST2021-01-09T04:20:41+5:302021-01-09T04:20:41+5:30

कोल्हापूर : शिवसैनिकांची कोणीही घुसमट करू शकत नाही, महापालिकेची निवडणूक ताकदीवर लढायला शिवसैनिक खंबीर आहे, असा टोला नगरविकास मंत्री ...

Improved: No one can infiltrate Shiv Sainiks | सुधारित : शिवसैनिकांची कोणीही घुसमट करू शकत नाही

सुधारित : शिवसैनिकांची कोणीही घुसमट करू शकत नाही

कोल्हापूर : शिवसैनिकांची कोणीही घुसमट करू शकत नाही, महापालिकेची निवडणूक ताकदीवर लढायला शिवसैनिक खंबीर आहे, असा टोला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसला लगावला. महापालिकेची निवडणूक प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर हे दाखवून देऊ,असेही ते म्हणाले.

मंत्री शिंदे म्हणाले, राज्य शासनाने महापालिका क्षेत्रासाठी युनिफाईड प्रणालीचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय झाला आहे. त्यामुळे एफएसआयमधील गैरवापरला आळा आणि नागरिकांना परवडणारी घरे असा दुहेरी फायदा आहे. ३ हजार फुटांपर्यंत घरबांधणीसाठी १० दिवसांत परवानगी मिळणार आहे.

चौकट

मंत्री शिंदे म्हणाले..,.

महापालिकेतील रिक्त पदे भरणार

महापालिकेतील प्रकल्पातील अडचणी दूर करणार

केंद्र, राज्य शासनाच्या नवीन योजनेतून केएमटी सक्षम करणार

भुयारी वाहतूक, बायपास, उड्डाणपूल करून शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करू

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणचा नागरिकांच्या भावनेनुसार निर्णय

चौकट

ठाकरे गार्डनसाठी ५ कोटी

राजहंस प्रिटिंग प्रेसच्या पिछाडीस महापालिकेच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गार्डन करण्यात येणार आहे. महापालिकेकडून तसा प्रस्तावही केला आहे. या गार्डनसाठी ५ कोटींचा निधी दिला जाणार असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

चौकट

सर्वांना विश्वास घेऊन कोल्हापूरची हद्दवाढ

गेल्या ४० वर्षांपासून हद्दवाढीचा विषय चर्चेत आहे. शहराचा विस्तारीकरण होत आहे. शहरातील नागरिकांची हद्दवाढीची मागणी आहे. सध्या प्राधिकरण नियुक्त केले आहे. लोकांच्या फायदाचा विचार करून सर्वसंमतीने हद्दवाढीचा निर्णय घेऊ, असे मंत्री शिंदे म्हणाले.

Web Title: Improved: No one can infiltrate Shiv Sainiks