सुधारित... मनोहर भोसले ढोंगी, बाळूमामांच्या भक्तांनी बळी पडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:44+5:302021-09-10T04:30:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मनोहर भोसले हा भोंदू असून, अशा भोंदूबाबांना बाळूमामांच्या भाविकांनी ...

Improved ... Manohar Bhosale hypocrites, devotees of Balumama should not fall prey | सुधारित... मनोहर भोसले ढोंगी, बाळूमामांच्या भक्तांनी बळी पडू नये

सुधारित... मनोहर भोसले ढोंगी, बाळूमामांच्या भक्तांनी बळी पडू नये

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मनोहर भोसले हा भोंदू असून, अशा भोंदूबाबांना बाळूमामांच्या भाविकांनी बळी पडू नये, असे आवाहन भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील सद्गुरू श्री बाळूमामा देवालयाच्यावतीने करण्यात आले आहे. भोसले आणि बाळूमामा देवालय, आदमापूरचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगण्यात आले.

बाळूमामांचा भक्तगण हाच बाळूमामांचा प्रपंच, बाळूमामांचा अवतार आहे. त्यांचे वंशज कोणीही नाही. तसे असल्याचे भासवत असेल, तर ते साफ खोटे आहे, असे यावेळी निक्षून सांगण्यात आले. बाळूमामा देवालयाचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन भोसलेच्या फसवणुकीपासून समाजाने सावध राहण्याचा इशारा दिला. यावेळी सचिव रावसाहेब कोणकेरी, सरपंच विजय गुरव उपस्थित होते. अधिक माहिती घेऊन अशांवर वेळ पडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

कार्याध्यक्ष मगदूम म्हणाले, बाळूमामांनी १९६६ मध्ये आदमापूर येथे देह ठेवला आणि भक्तांवर मोठी कृपा ठेवली. अंधश्रद्धेच्या जोखडातून सर्वसामान्य लोकांना मुक्त करण्याचे काम त्यांनी उभ्या आयुष्यभर केले. मुक्या प्राण्यांची सेवा करण्याची शिकवण दिली. मात्र, बाळूमामांच्या वाढत्या कीर्तीचा गैरफायदा घेण्याचे काम भोसलेसारख्या काहीजणांकडून सुरू आहे. बाळूमामांच्या २२ हजार बकऱ्या आहेत. काहीजण मानधन तत्त्वावर त्यांची राखण करत आहेत. बकऱ्या पुढे जातील तसे काही ढोंगी साधू निर्माण होत आहेत. बाळूमामांचा भंडारा देऊन आपला आर्थिक फायदा करून घेत आहेत. अशा भक्तांची लूट करणाऱ्या तांत्रिक-मांत्रिक बाबांपासून भाविकांनी सावध रहावे.

विजय पाटील म्हणाले, बाळूमामाचा अवतार आहे, असे सांगून भोसले याने आपला मठ स्थापन केला आहे. त्याला राजकीय वरदहस्त आहे. तेथील वीजकनेक्शनही अनधिकृत आहे. गरज पडली, तर अशांच्यावर पोलिसात तक्रार देणार आहे.

अध्यक्ष भोसले म्हणाले, बाळूमामांच्या आदमापूर येथील देवस्थानात देणगीची अधिकृत पावती दिली जाते. अन्य कोणी मामांच्या नावावरून पैसे मागत असल्यास त्याला देवस्थान जबाबदार राहणार नाही. असे कोणी पैसे गोळा करत असल्यास भाविकांनी पोलिसांशी संंपर्क साधावा.

यावेळी विश्वस्त गोविंद पाटील, व्यवस्थापक अशोक पाटील उपस्थित होते.

Web Title: Improved ... Manohar Bhosale hypocrites, devotees of Balumama should not fall prey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.