हातभट्टीवर छापे, सुमारे दोन लाखांची दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:27+5:302021-06-03T04:18:27+5:30
अधिक माहिती अशी, बोंगार्डेवाडी, ता. भुदरगड येथील बाबूराव सखाराम पताडे आणि बळवंत दत्तात्रय बेलेकर यांच्या गावठी हातभट्टीच्या गुत्यावर ...

हातभट्टीवर छापे, सुमारे दोन लाखांची दारू नष्ट
अधिक माहिती अशी, बोंगार्डेवाडी, ता. भुदरगड येथील बाबूराव सखाराम पताडे आणि बळवंत दत्तात्रय बेलेकर यांच्या गावठी हातभट्टीच्या गुत्यावर छापा टाकून अनुक्रमे ९३ हजार ७००आणि ३८ हजार असा एकूण एक लाख ३१ हजार ७०० रुपयांची कच्ची दारू तर पंडिवरे, ता. भुदरगड येथे बाजीराव नाना पठाडे यांच्याकडील ३३ हजार रुपयांची, आप्पाचीवाडी, ता. भुदरगड येथील कुंडलिक श्रीपती गायकवाड यांच्याकडील २८ हजारांची हातभट्टीची दारू नष्ट केली, असे एकूण एक लाख ९२ हजार ७०० रुपयांची हातभट्टीची दारू नष्ट केली. या चौघांवर भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगड पोलीस करीत आहेत.
फोटो
दारूभट्टीवर छापा टाकून गावठी दारू नष्ट करताना भुदरगड पोलीस निरीक्षक संजय मोरे सोबत विक्रम चौत्रे, दत्तात्रय शिंदे आदी.