शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

क्रीडा विकासासाठी महत्त्वाचा प्रयोग--मधुरिमाराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:43 IST

खेळाडूला शारीरिक व मानसिक, तांत्रिक बाबींची परिपूर्ण माहिती देणारी ही कार्यशाळा कोल्हापूर नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. खेळाच्या वाढीसाठी ही कार्यशाळा म्हणजे महत्त्वाचा प्रयोग ठरणार

ठळक मुद्दे‘स्पोर्टस सायन्स’ आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर : खेळाडूला शारीरिक व मानसिक, तांत्रिक बाबींची परिपूर्ण माहिती देणारी ही कार्यशाळा कोल्हापूर नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. खेळाच्या वाढीसाठी ही कार्यशाळा म्हणजे महत्त्वाचा प्रयोग ठरणार आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महिला समिती अध्यक्षा मधुरिमाराजे यांनी व्यक्त केले.

न्यू कॉलेज व कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट अ‍ॅँड रिसर्च फौंडेशनतर्फे हॉटेल सयाजी येथे बुधवारी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे होते.

मधुरिमाराजे म्हणाल्या, नव्याने खेळांमध्ये करिअर करणाऱ्या युवकांना अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे बळ मिळेल. खेळाच्या वाढीसाठी हा महत्त्वाचा प्रयोग ठरणार आहे. कार्यशाळेत सहभागी होऊन स्वत:ला अधिक सामर्थ्यवान बनवावे. यात मोबाईल अ‍ॅपचाही वापर करावा. अशा कार्यशाळा खेळाडूंमध्ये जनजागृती निर्माण करतात. त्यामुळे त्याचा फायदा सहभागी होणाऱ्यांना निश्चितच होईल.

पहिल्या सत्रात प्रसिद्ध स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट डॉ. संदीप चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अनेकजण व्यायामाची पुरेशी माहिती न घेता व्यायाम करतात. हा व्यायाम शरीराला फायदेशीर होण्यापेक्षा घातक ठरतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रत्येक अवयवानुसार व्यायामप्रकार ठरलेला असतो. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार प्रथम शरीर गरम (वॉर्मअप) करावे व त्यातून हलका घाम आला पाहिजे. लवचिकता (स्ट्रेचिंग) महत्त्वाची असते. घाईगडबडीत व्यायाम केल्यास त्यातून गंभीर इजा पोहोचू शकते. हे टाळण्यासाठी आवश्यक ती साधने, योग्य प्रशिक्षक यांची निवड करणे गरजेचे आहे.

खेळातील मानसशास्त्र यावर क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. करणबीर सिंग म्हणाले, शरीराबरोबर मनाचेही आरोग्य महत्त्वाचे असते. खेळाडूला शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमताही तितक्याच वाढवाव्या लागतात. कसोटीच्या क्षणी धैर्य, आत्मविश्वास व खेळाडूचे मनोबल वाढविण्यात मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. मानसशास्त्र यश मिळविण्यासाठी मानसिकदृष्ट्या सुदृढ बनविते.

कार्यशाळेत प्रशिक्षणाच्या पद्धती यावर डॉ. हरीश पंदजरेथील व खेळातील ‘बॉयोमॅकनिक्स’वर डॉ. अजय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. धावपटू गौरेश पोवार याने खेळातील संधी व परदेशातील क्रीडाशिक्षण याबद्दल मार्गदर्शन केले. यात १३ क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींसह खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक असे १५० हून अधिक जण सहभागी झाले होते. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, अर्जुन पुरस्कार विजेत्या टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. अमर सासने यांनी आभार मानले. कार्यशाळा संयोजनात प्रा. प्रकुल मांगोरे-पाटील, दिग्विजय मळगे, डॉ. शरद बनसोडे, सुभाष पवार, आदींनी परिश्रमघेतले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर