शिवाजी मंदिरात आज महत्त्वाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:17 IST2021-06-10T04:17:49+5:302021-06-10T04:17:49+5:30

कोल्हापूर : मराठा आरक्षणाकरिता १६ पासून आयोजित केलेल्या राज्यव्यापी मोर्चाच्या नियोजनाबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने आज, गुरुवारी शिवाजी ...

Important meeting today at Shivaji Temple | शिवाजी मंदिरात आज महत्त्वाची बैठक

शिवाजी मंदिरात आज महत्त्वाची बैठक

कोल्हापूर : मराठा आरक्षणाकरिता १६ पासून आयोजित केलेल्या राज्यव्यापी मोर्चाच्या नियोजनाबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने आज, गुरुवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीसाठी जिल्ह्यासह शहरातील आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती आजी-माजी पदाधिकारी, सर्व वाहतूक संघटना, तरुण मंडळे, शासकीय संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा संघटना आदींनी सहभागी व्हावे. असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे रविकिरण इंगवले, महेश जाधव, निवासराव साळोखे, सुजित चव्हाण, बाबा पार्टे, अजित राऊत, सुरेश जरग, जयकुमार शिंदे, श्रीकांत भोसले, प्रकाश घाडगे, शरद नागवेकर, राजू जाधव, सुभाष जाधव, दिलीप देसाई, ॲड. बाबा इंदुलकर, सचिन तोडकर, अनिल कदम, हर्षल सुर्वे, बाळासाहेब घाडगे, सुशील भांदिगरे आदींनी केले आहे.

Web Title: Important meeting today at Shivaji Temple