महत्त्वाचे संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:47+5:302021-03-27T04:25:47+5:30
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सहा हातगाड्यांवर कारवाई केली. याबाबत नगरपालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या ...

महत्त्वाचे संक्षिप्त
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सहा हातगाड्यांवर कारवाई केली. याबाबत नगरपालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार उत्तम-प्रकाश चित्रमंदिर, तीन बत्ती चार रस्ता, आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी, बाजार परिसरात हातगाडे लावण्यावरून वादाचे प्रसंग घडत आहेत. तक्रार प्राप्त होण्याची वाट न पाहता नगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
................
पालिकेची करवसुली मोहीम
इचलकरंजी : नगरपालिकेच्या करवसुली विभागाने सांगली रोडवरील वॉर्ड नं. ९ मध्ये करवसुलीची मोहीम राबविली. त्यामध्ये अडीच लाख रुपयांची वसुली झाली. या भागात सुमारे ५० लाख रुपये कर थकीत आहे. त्यातील फक्त २५ मालमत्ताधारकांकडून अडीच लाख रुपये कर वसूल करण्यात आले. त्यासाठी पालिकेची विविध पाच पथके शुक्रवारी दिवसभर कार्यरत होती.