कोरोना काळात होमिओपॅथीचे महत्त्व वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:59+5:302021-03-26T04:22:59+5:30
कोल्हापूर : कोरोना काळात अर्सेनिक अल्बम या औषधाचा वापर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून झाल्यामुळे होमिओपॅथीचे महत्त्व वाढले. असे प्रतिपादन शिवाजी ...

कोरोना काळात होमिओपॅथीचे महत्त्व वाढले
कोल्हापूर : कोरोना काळात अर्सेनिक अल्बम या औषधाचा वापर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून झाल्यामुळे होमिओपॅथीचे महत्त्व वाढले. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी.टी. शिर्के यांनी केले. होमिओपॅथिक मेडिकल काॅलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा)ने ताराराणी चौक (कोल्हापूर) येथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या ‘होमेसाकाॅन २०२१’परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कुलगुरू डाॅ. शिर्के म्हणाले, होमिओपॅथींनी आयुष्यभर नवनवे शिकत राहावे व स्वत:चे वैद्यकीय ज्ञान सतत अपडेट ठेवून संशोधनाची नाते जोडावे. ज्यामुळे संपूर्ण समाज आरोग्यदायी राहील. कोरोना संक्रमणात वैद्यकीय क्षेत्रातील होमिओपॅथीसह सर्वच विभागांचे महत्त्व वाढले आहे. हे नाकारून चालणार नाही. कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले.
‘नॅशनल कमिशन फाॅर होमिओपॅथी’ची रचना, कायदा व उद्दिष्ट्ये यासह त्याचा होमिओपॅथी औषधप्रणालीच्या विकासावर होणारे परिणाम प्राचार्य डाॅ. रोझारिओ डिसोझा (गडहिंग्लज) यांनी यांनी विषद कले. परिषदेत डाॅ. मनीषा शर्मा (मुंबई), डाॅ. पायल परमार (मुंबई) यांचेदेखील व्याख्यान झाले. प्रारंभी होमेसा प्रेसिडेंट डाॅ.राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. संयोजक सचिव डाॅ. सुनेत्रा शिराळे यांनी ‘कोरोना-काहीही कायमचे टिकत नाही’ या परिषदेच्या संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. सचिव डाॅ. राजेश कागले यांनी आभार मानले. परिषद यशस्वी होण्यासाठी डाॅ. हिम्मतसिंह पाटील, डाॅ. सुहास पाटील, डाॅ. अन्वर गंजेली, डाॅ. हर्षवर्धन जगताप, डाॅ. शीतल पाटील, डाॅ. सुधीर जरे आदींनी परिश्रम घेतले. परिषदेत तीन हजारांहून होमिओपॅथसनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला होता.
फोटो : २५०३२०२१-कोल-होमिओपॅथी काॅलेज न्यूज
ओळी : कोल्हापुरातील ताराराणी चौकातील होमिओपॅथिक मेडिकल काॅलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा)तर्फे ‘होमेसाकाॅन’ परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी.टी.शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
===Photopath===
250321\25kol_1_25032021_5.jpg
===Caption===
फोटो : २५०३२०२१-कोल-होमिआेपॅथी काॅलेज न्यूज आेळी : कोल्हापूरातील ताराराणी चौकातील होमिआेपॅथिक मेडीकल काॅलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) तर्फे होमिआेपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या ‘होमेसाकाॅन २०२१’परिषदेचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. डी.टी.शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.