कसबा तारळे परिसरात गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:50+5:302021-09-19T04:24:50+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षीही लाडक्या विघ्नहर्त्या ...

कसबा तारळे परिसरात गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षीही लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शांततेत निरोप दिला.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी दिसणारा सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीतील डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, लाईटचा झगमगाट, संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई, डामडौल आदी गोष्टींचा लवलेशही या मिरवणुकीत दिसत नव्हता. मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाच्या जयघोष करत अनेक मंडळांनी भोगावती नदी घाटावर निरोप दिला.
दरम्यान, कसबा तारळेसह परिसरातील पिरळ, कुंभारवाडी, तारळे खुर्द, कंथेवाडी करंजफेण, कुडुत्री, गुडाळ, खिंडी व्हरवडे आदी गावातही सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. यावेळी राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोबत फोटो : कसबा तारळे येथील ओम गणेश मित्र मंडळ व वेताळेश्वर मंडळाच्या गणरायाची शांततेत निघालेली मिरवणूक.