शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘अमर रहे’च्या घोषामध्ये अटलजींच्या अस्थींचे पंचगंगा नदीमध्ये विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 19:34 IST

‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे‘अमर रहे’च्या घोषामध्ये अटलजींच्या अस्थींचे पंचगंगा नदीमध्ये विसर्जनचंद्रकांत पाटील, महादेव जानकर यांची उपस्थिती

कोल्हापूर : ‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत सहभागी झाले होते.शनिवारी सकाळी १० वाजता दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून बिंदू चौक येथे आणण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिल्यानंतर अस्थिकलश पंचगंगा घाटाकडे रवाना करण्यात आला.चारचाकी वाहनावर फुलांनी सजविलेल्या उंचवट्यावर अस्थिकलश ठेवण्यात आला होता. यावेळी स्पीकरवर अटलबिहारींची भाषणे आणि कविता लावण्यात आल्या होत्या. पालकमंत्री पाटील, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सुभाष वोरा, बाबा देसाई हे सर्वजण या वाहनाच्या मागून चालत निघाले.देवल क्लबजवळ पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हेदेखील या सर्वांसोबत सहभागी झाले. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे सर्वजण पंचगंगा घाटावर आले. वाटेमध्ये अनेक ठिकाणी नागरिक, पदाधिकारी आणि विविध संघटनांच्यावतीने अस्थिकलशावर फुले अर्पण करण्यात आली. मंत्री पाटील यांच्या हस्ते अस्थिविसर्जन करण्यात आले. 

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलMahadev Jankarमहादेव जानकर