पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास परवानगी द्यावी : मनसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:02+5:302021-09-18T04:25:02+5:30
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांत बदल करून अनंत चतुर्थीदिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती पंचगंगा नदीमध्ये विसर्जन ...

पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास परवानगी द्यावी : मनसे
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांत बदल करून अनंत चतुर्थीदिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रांत कार्यालय व नगरपालिकेत दिले.
निवेदनात, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने कार्यक्रमासाठी शंभर लोकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे हिंदूंच्या सणांवरच निर्बंध का? दान केलेल्या गणेशमूर्ती कुठे व कशा विसर्जित केल्या जातात, हे नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. प्रशासनाने शहापूर खणीत विसर्जन करण्यास सांगितले; परंतु त्या खणीमध्ये जलपर्णी व गटारीचे पाणी आहे. यातच विसर्जन करायचे का, या बाबी लक्षात घेऊन गणेशमूर्ती विसर्जनास वाजत-गाजत मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत पंचगंगा घाटावरच परवानगी मिळावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात प्रताप पाटील, रवी गोंदकर, शहाजी भोसले, मोहन जोशी, राजेंद्र निकम आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.