शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सुटकेचा निःश्वास... तूर्त महापुराचे संकट टळले, पंचगंगेचे पाणी ओसरू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 20:33 IST

धरणक्षेत्रासह शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, पंचगंगा नदीच्या पुराचे पाणीही ओसरत आहे. यामुळे सध्या तरी महापुराचे संकट टळले आहे. पूरक्षेत्रासह शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून, त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्दे... तूर्त महापुराचे संकट टळले,शहरातील चित्र पुराचे पाणी ओसरू लागले

कोल्हापूर : धरणक्षेत्रासह शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, पंचगंगा नदीच्या पुराचे पाणीही ओसरत आहे. यामुळे सध्या तरी महापुराचे संकट टळले आहे. पूरक्षेत्रासह शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून, त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार सुरुवात झाली. यामध्ये राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्याने शहरातील अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले.

यंदाही महापूर येणार अशीच स्थिती होती. सुदैवाने गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रांसह शहरातही पावसाचा जोर कमी झाला. यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी कमी होत आहे. परिणामी शहरातील पूर ओसरू लागला आहे. शाहूपुरी, कुंभार गल्ली आणि सुतारवाडा येथील पाणी उतरत आहे.पंचगंगा तालीम येथीलही पाणी उतरलेपंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्यामुळे गंगावेश ते शिवाजी पूल हा मार्ग बंद आहे. शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पंचगंगा तालमीपर्यंत पुराचे पाणी आले होते. शनिवारी सकाळपासूनच पाण्याची पातळी कमी होत गेली. सायंकाळी पंचगंगा तालीम येथील पाणी उतरत असून आखरी रस्ता गल्ली येथेपर्यत आले. जामदार क्लब, गायकवाड पुतळा परिसरात अद्यापही पुराचे पाणी आहे.दुसऱ्या दिवशीच व्हीनस कॉर्नर येथील पाणी उतरलेमागील वर्षी दसरा चौकातील टायटन शोरूमपर्यंत महापुराचे पाणी आले होते. येथे आठ दिवस पाणी होते. नागरिकांना स्थलांतरित केले होते. शुक्रवारी व्हीनस कॉर्नर ते स्टेट बँक रस्त्यावर पाणी आल्यामुळे तो बंद झाला होता. येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शनिवारी दुपारनंतर हा रस्ताही खुला झाला.खोल खंडोबा मंदिरात पाणीशनिवार पेठेमध्ये खोल खंडोबा मंदिर आहे. सर्वांत जुने म्हणजे ४०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. तिथे शनिवारी पाणी आले. पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर मच्छिंद्री झाली तरच या ठिकाणी अशा प्रकारे पाणी येते. भक्तजण मोठ्या संख्येने पाणी पाहण्यासाठी येथे येत आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर