इमाम इलियासींनी दिला शांतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:30+5:302021-02-05T07:01:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नेसरी : देशाचे मुख्य इमाम डाॅ. इमाम उमेर अहमद इलियासी यांनी चंदगड विधानसभा मतदार संघाचे ...

Imam Ilyasi gave a message of peace | इमाम इलियासींनी दिला शांतीचा संदेश

इमाम इलियासींनी दिला शांतीचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नेसरी : देशाचे मुख्य इमाम डाॅ. इमाम उमेर अहमद इलियासी यांनी चंदगड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना संघटक तथा माजी बांधकाम व आरोग्य सभापती संग्रामसिंह कुपेकर यांच्या कानडेवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. यावेळी कुपेकर परिवारातर्फे इमाम यांचे स्वागत करण्यात आले. इमाम यांनी शांतीचा संदेश देताना चांगल्या कामाचे फळ चांगलेच मिळते, असे सांगितले. यावेळी संग्रामसिंह कुपेकर, भय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, वंदनादेवी कुपेकर, यशोमती कुपेकर, गंधालीदेवी कुपेकर, रविराज कुपेकर, सीमादेवी कुपेकर, मंदिरा कुपेकर, चंदगड नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, तजमुल फणीबंद, अबीद मनसुळी, डाॅ. झाकीर चिंचणेकर, नगरसेवक जाकीर नाईक, बादशाह मुल्ला, प्रमोद कांबळे, भैरू पाटील- वाघराळीकर, कृष्णराव वाईंगडे, अस्लम बागवान, एन. डी. कांबळे, गफूर बाणदार, उस्मान कदीम, उस्मान वाटंगी, राजू रेडेकर, रामू नाईक, माजी सरपंच अनिता कुंभार यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Imam Ilyasi gave a message of peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.