गोकुळ दूध संघाची प्रतिमा देशात मोठी : राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:11+5:302021-06-16T04:34:11+5:30

जयसिंगपूर : गोकुळने सातत्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ या ...

The image of Gokul Dudh Sangh is big in the country: Rajendra Patil-Yadravkar | गोकुळ दूध संघाची प्रतिमा देशात मोठी : राजेंद्र पाटील-यड्रावकर

गोकुळ दूध संघाची प्रतिमा देशात मोठी : राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर : गोकुळने सातत्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ या संघाची प्रतिमा देशभरातील दूध संघांच्या तुलनेत मोठी आहे. जुन्या, नव्या सहकारी विश्वस्तांना सोबत घेऊन गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील दूध उत्पादकांच्या हिताचे चांगले निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

कवठेसार (ता. शिरोळ) येथे गोकुळच्या वतीने उभारण्यात आलेल्या बल्क मिल्क कुलरचे उद्घाटन झाले. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील प्रमुख उपस्थित होते. मंत्री यड्रावकर म्हणाले, गोकुळच्या एकूण कार्य पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. गोकुळला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी संघटित प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गोकुळचे संचालक सुजित मिणचेकर, अजित नरके, करणसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगुले, शशिकांत चुयेकर, पोपट भोकरे, बशीर फकीर, सुशांत पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते.

फोटो - १४०६२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ - कवठेसार (ता. शिरोळ) येथे गोकुळ दूध संघाच्या बल्क मिल्क कुलरचे उद्घाटन गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले.

Web Title: The image of Gokul Dudh Sangh is big in the country: Rajendra Patil-Yadravkar