शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

इमान मातीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:50 IST

फार्म हाऊस कृषी पर्यटन केंद्र, अमरावती येथे दुपारच्या जेवणासाठी मित्रांच्या सोबत गेलो होतो. त्या फार्म हाऊसमध्ये एक विदेशी महिला ...

फार्म हाऊस कृषी पर्यटन केंद्र, अमरावती येथे दुपारच्या जेवणासाठी मित्रांच्या सोबत गेलो होतो. त्या फार्म हाऊसमध्ये एक विदेशी महिला लहान कुत्र्याला झालेल्या जखमेवर औषधोपचार करत होती. त्यात ती तल्लीन झाली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. कुत्र्याच्या दु:खासाठी तिची संवेदनशीलता मनामध्ये उत्सुकता निर्माण करणारी होती. मी सहज चौकशीला सुरुवात केली. ती त्या फार्म हाऊसची मालकीण होती. तिचा पती पंकज सावरकर हा अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यातील तरुण. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर तो नोकरीच्या निमित्ताने पोर्तुगालला गेला होता आणि तिथल्या वास्तव्यामध्ये या तरुणीशी त्याचा प्रेमविवाह झाला होता. तिथं पंकज राहत असताना मायदेशामध्ये राहत असलेल्या आई-बाबांविषयीची त्याच्या मनामध्ये ओढ होती.लहानपणापासून मातीच्या निसर्गाची आवड असलेला पंकज पोर्तुगालमध्ये दीर्घकाळ स्थिर होऊ शकला नाही. वृद्धापकाळी आई-बाबांच्या जवळ असायला हवं, त्यांची सेवा करता यायला हवी म्हणून मोठ्या पगाराची नोकरी सोडून हे दोघेजण भारतामध्ये परत आले. इथे आल्यानंतर प्रश्न होता पोटा-पाण्याचा. सुरुवातीला त्यांनी चहाची टपरी टाकली. या टपरीवर नाष्टा, चहाची व्यवस्था करून त्याने सुरुवात केली. सेवाभावी वृत्ती हसरा चेहरा आणि प्रत्येकाबरोबर प्रेमाने वागणं यातून त्यांच्या व्यवसायाची वाढ झाली. आता त्याच्या व्यवसायात जोर धरला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत या फार्म हाऊसवर हाऊसफुल्ल गर्दी असते. या व्यवसायाच्या बळकटीकरण यामध्ये त्यानं या तत्त्वाची जोपासना केली आहे. ती मोठी विलक्षण आहे. फार्म हाऊसमध्ये प्रवेश करतानाच काहीच छान उपदेशपर पाट्या वाचायला मिळतात. इथं मद्यसेवनास मनाई आहे. आपण आपल्या घरचं जेवण आणून इथं खाऊ शकता. इथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आत भारतीय बैठक आहे. टेबल-खुर्ची यांची बैठक आहे. ज्याला जसे हवे तसे तो बैठकीचा वापर करु शकतो. इथले सगळे पदार्थ आई-बाबांचे रेसिपी तयार होतात. स्वत: आई इथल्या प्रत्येक पदार्थाचा मसाला तयार करते. इथलं वातावरण अगदी अनौपचारिक आहे. सर्वप्रकारचे महाराष्ट्रीय पदार्थ इथे मनापासून तयार करून दिले जातात. सात-आठ मुलींसह आया-बहिणी खूप आनंदानं हा स्वयंपाक करत असतात. इथे मालक आणि नोकर असा भेदच नाही. प्रसन्नचित्ताने आनंदाने एकमेकांशी वागत असतात आणि सेवा करतात. चर्चा करत असताना पंकज असं सांगत होता की काल रात्री इतकी गर्दी होती की, नऊ वाजता आलेल्या अतिथींना मी बारा वाजेपर्यंत जेवण देऊ शकलो नाही. मी त्यांना अनेक वेळेला विनंती केली की, खूप उशीर होईल आपण दुसरीकडे जा; पण तीन तासांची वाट पाहणं त्यांनी मान्य केलं. पण, इथेच भोजन घेऊन तृप्त झाले ही माझ्या यशाची पावती आहे. सर्वसण अतिथींसोबत आनंदाने साजरे केले जातात. आपल्या एकट्याच्याच व्यवसायाची वृद्धी हा हेतू पंकजचा नाहीये. खेड्यातून येणाऱ्या कोणत्याही शेतकºयाला आपल्या मालाची विक्री करायची असेल तर त्याच्यासाठी त्यानं मोफत स्टॉलची व्यवस्था केली आहे. एखाद्या नवीन उद्योजकाला आपल्या मालाची जाहिरात करायची असेल तर त्यासाठी त्याच्या भिंतीचा वापर तो मोफत करून देतो. आम्ही सर्वजणांनी विकसित व्हायचं आहे, हा त्याचा ध्यास आहे. अख्ख जग फिरल्यानंतर जगात सुरू असलेला व्यवहार पंकजमध्ये यायला हवा होता; पण इथल्या व्यवसायामध्ये व्यवहार नाहीच आहे. इथं आहे ओलावा, इथं आहे स्वत:हून इतर आणि जगावं ही शुद्ध भावना परदेशात गेल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी असताना तिथं स्थिर होऊ शकला असता, पण आई-बाबांची सेवा यासाठी परत आलेला पंकज जगापेक्षा वेगळा आहे. एका बाजूला विमानतळावरच आई-बाबांना सोडून जाणारी मुलं फक्त बाळंतपणासाठी परदेशात आपल्या आई-बाबांना बोलणारी मुलं इथल्या वृद्धाश्रमांमध्ये आई-बाबांना ठेवून वर्ष-वर्ष विचारपूस करणारी मुलं हे पाहिलं. पंकज हे जगणं किती उत्कट जगतो याची जाणीव होते. या व्यवसायातून तो रक्ताची नाती जपतो आहे, पण जोडलेली नाती ही चिरंतन ठेवतो आहे. या व्यवसायात परदेशी असलेली त्याची पत्नी जीवाभावापासून त्याला साथ देते आहे. हा बंध पाहिल्यानंतर ते एकमेकांसाठी जगत आहेत याचा अनुभव येतो. पंकजसारखी तरुणाई अनेकांना जीवनाचा अर्थ समजावून जाते. रात्रं-दिवस आपल्या व्यवसायात वाढ होत असताना निर्माण झालेली नाती ही जपण्यात त्याला मोठा आनंद आहे. चेहºयावरचे समाधान येणाºया माणसांची मनापासून घेतली जाणारी काळजी आणि अखंड कष्टाची तयारी हे पंकज व्यक्तिगत जीवनाचे आणि त्याच्या व्यवसायाचे यश आहे. भोगवादी समाजामध्ये स्वत: जगून इतरांना जगण्याची प्रेरणा देणारा पंकज हा वेगळाच आहे, अशी विचाराची वाट चोखाळणारी पिढी तयार व्हावी आणि तुकोबांच्या म्हणण्यानुसार आपण तरला विशेष काय अनेकांना तारतो हे विशेष.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)