शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

मी बेजबाबदार, मी ‘सेल्फी-श’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 4:36 PM

पोलिसांनी वेळोवेळी सांगितले; पण नागरिक बेजबाबदारपणे वागून रस्त्यावर विनाकारण भटकत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आता

कोल्हापूर : ‘बाहेर पडला, त्याला कोरोना नडला’ अशा पद्धतीने मृत्यूचे भय वाटावे यासाठी करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पुढाकाराने प्रबोधनाची नवी पद्धत अवलंबली आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना जरब बसविण्याचीही सोय केली आहे. अशा बेजबाबदार नागरिकांसाठी आता ‘घराबाहेर पडाल तर मृत्यूला कवटाळाल’ असाच संदेश देत कळंबा (ता. करवीर) येथे मंगळवारपासून एक ‘सेल्फी पॉइंट’ उभारला आहे. तेथील ‘मी बेजबाबदार, मी ‘सेल्फी’श’ हा उल्लेख साऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे पोलिसांनी वेळोवेळी सांगितले; पण नागरिक बेजबाबदारपणे वागून रस्त्यावर विनाकारण भटकत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आता करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पुढाकाराने हा सेल्फीचा प्रभावी उपक्रम सुरू केला आहे.

करवीर विभागात कोल्हापूर ते गारगोटी या मुख्य मार्गावर कळंबा येथे ‘सेल्फी विथ बेजबाबदार नागरिक’ हा सेल्फी पॉइंट उभा केला आहे. विनाकारण फिरणाºयांना पकडून आणून तेथे पुष्पहार घालून सेल्फी काढले जातात. त्या सेल्फी पॉइंटवर ‘मी बेजबाबदार, मी ‘सेल्फी’श’, बाहेर पडाल तर कोरोना नडाल’ अशी प्रबोधनात्मक वाक्ये लिहिली आहेत. तो घराबाहेर पडणार नाही हाच पोलिसांचा उदात्त हेतू आहे. अनंत खासबारदार आणि अविनाश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना साकारली आहे.सेल्फी विथ गुन्हाहीबेजबाबदार नागरिकाचा या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढल्यानंतर त्याच्यावर पोलीस ठाण्यात लॉकडाऊन कायद्याचा भंग केल्याचा गुन्हाही नोंदविला जाणार आहे.मुरगूड, गांधीनगरातही उपक्रमकळंब्यापाठोपाठ करवीर पोलीस उपविभागातील मुरगूड, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, आदी ठिकाणीही अशा पद्धतीचे सेल्फी पॉइंट उभारणार असल्याचे उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस