शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात घातक मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शनची अवैध विक्री, प्रयाग चिखलीतील विक्रेत्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:22 IST

दिल्लीतून कुरिअरने मागवले

कोल्हापूर : शरीर पिळदार आणि आकर्षक बनविण्यासाठी आरोग्यास घातक मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायेदशीर विक्री करणारा अमोल अशोक पाटील (वय ३४, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ६३ हजार रुपये किमतीच्या ६३ बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी (दि. २१) सायंकाळी पन्हाळा रोडवर रजपूतवाडीच्या हद्दीत एका लॉजजवळ सापळा रचून केली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना कमी वेळेत त्यांचे शरीर पिळदार आणि आकर्षक बनविण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधित औषधांची विक्री होत असल्याची माहिती अंमलदार सत्यजीत तानुगडे यांना मिळाली होती. संशयित विक्रेता रजपूतवाडीजवळ येणार असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सापळा रचून अमोल पाटील याला अटक केली.अंगझडतीत त्याच्याकडे मेफेनटेरमाइन सल्फेट या प्रतिबंधित औषधाच्या बाटल्या मिळाल्या. जीममध्ये व्यायाम करणारे तरुण, पैलवान, शरीरसौष्टवपटू, बॉक्सर अशा खेळाडूंना याची विक्री करीत असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ६३ हजार रुपये किमतीच्या बाटल्या जप्त केल्या.याबाबत पाटील याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. उपनिरीक्षक गळवे यांच्यासह अंमलदार तानुगडे, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, संतोष बरगे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, प्रदीप पाटील, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.दिल्लीतून कुरिअरने मागवलेअटकेतील अमोल याने काही वर्ष पैलवानकी केली आहे. त्यामुळे त्याला उत्तेजक औषधे आणि स्टेरॉइडची माहिती आहे. दिल्लीतील अजित कुमार या तरुणाकडून कुरिअरने औषधे मागवल्याचे त्याचे पोलिसांना सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून विक्री करीत असल्याची कबुली त्याने दिली. अजित कुमार याच्याकडून औषधे मागवणारे आणखी काही तरुण जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

..तर वापर जीवघेणा ठरेलमेफेनटेरमाइनच्या वापराने हृदय, मज्जा संस्था आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. मांसपेशी फुगतात. रक्तदाब वाढून इतर विकार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर करणे जीवघेणे ठरू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.