गांधीनगरला बेकायदेशीर दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST2020-12-26T04:21:05+5:302020-12-26T04:21:05+5:30

याबाबतची पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील गोशाळा परिसरात बेकायदेशीर दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. ...

Illegal liquor stocks seized in Gandhinagar | गांधीनगरला बेकायदेशीर दारूसाठा जप्त

गांधीनगरला बेकायदेशीर दारूसाठा जप्त

याबाबतची पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील गोशाळा परिसरात बेकायदेशीर दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. यावेळी अनिल मनचुंडिया हा मोटार (क्र. एमएच ०९ सी एम ६९६६) मधून दारू घेऊन आला होता. पोलिसांनी मोटारीची तपासणी केली असता मोटारीत वेगवेगळ्या कंपन्यांची विदेशी दारू सापडली. पोलिसांनी मोटारीसह दारूसाठा जप्त केला.

याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी मनचुंडिया याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सपोनि दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, पोलीस नाईक मोहन गवळी, आकाश पाटील, आयुब शेख आदींनी सहभाग घेतला.

--------------

फोटो ओळी -

गांधीनगर (ता. करवीर) येथे बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या एकास ताब्यात घेतले. यावेळी स.पो.नि. दीपक भांडवलकर, पो.उ.नि. अतुल कदम, पो.ना. मोहन गवळी आकाश पाटील, आयुब शेख.

Web Title: Illegal liquor stocks seized in Gandhinagar