बेकायदेशीर कोरोना किट खरेदी़, एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:31 AM2021-09-09T04:31:36+5:302021-09-09T04:31:36+5:30

मलकापूर : कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होण्यासारखा धोका उत्पन्न करून सार्वजनिक आरोग्यास धोका उत्पन्न करण्याचे कृत्य ...

Illegal corona kit purchase, one charged | बेकायदेशीर कोरोना किट खरेदी़, एकावर गुन्हा दाखल

बेकायदेशीर कोरोना किट खरेदी़, एकावर गुन्हा दाखल

Next

मलकापूर : कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होण्यासारखा धोका उत्पन्न करून सार्वजनिक आरोग्यास धोका उत्पन्न करण्याचे कृत्य करणाऱ्या शाहूवाडी येथील दक्षता क्लिनिक लॅबोरेटरीचे नरेश अरुण सावंत (वय ३०, रा. चिंचणी, ता चंदगड, सध्या रा. उचत, ता. शाहूवाडी) यांच्याविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, नरेश सावंत यांची शाहूवाडी येथे शाहूवाडी दक्षता लॅबोरेटरी आहे. आय सी एम आर अथवा जिल्हा, तालुका आरोग्य विभागाची परवानगी नसताना आरटीपीसीआर चाचणीचे व रॅपिड ॲन्टिजन कार्ड टेस्टचे किट बेकायदेशीर खरेदी करून त्याचा वापर कोरोनासारख्या संसर्गजन्य रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांचे रिपोर्ट तोंडी सांगून कोणत्याही पोर्टलवर अथवा संबंधीत शासकीय यंत्रणेस न कळवता संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होण्यासारखा धोका निर्माण केला आहे. तपासणी किट बेकायदेशीर खरेदी केली असल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास फौ. प्रियांका सराटे करीत आहेत.

Web Title: Illegal corona kit purchase, one charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.